20.1 C
New Delhi
Wednesday, December 17, 2025
Homeक्रीड़ाबास्केटबॉलमध्ये ध्रुव ग्लोबल स्कूलला तिहेरी यश

बास्केटबॉलमध्ये ध्रुव ग्लोबल स्कूलला तिहेरी यश

पुणे, – ः नांदे येथील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या बास्केटबॉल संघानी उत्कृष्ट कौशल्य आणि संघ भावनेच्या जोरावर यंदाच्या जिल्हा परिषद आणि झोनल स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत तिहेरी यश संपादन केले आहे. मुलांच्या अंडर १७ मध्ये कांस्य पदक , मुलींचा अंडर १४ मध्ये  जिल्हास्तरीय विजेतेपद आणि मुलींच्या अंडर १४ झोनल स्पर्धेत कांस्य पदक मिळाले. तसेच ध्रुव ग्लोबल स्कूलची खेळाडू जूई गोडबोले हीची राज्य निवड चाचणीसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल ध्रव ग्लोबल स्कूलचे संचालक यशवर्धन मालपाणी व प्राचार्य संगीता राऊतजी यांनी सर्व खेळाडू तसेच प्रशिक्षकांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.


जिल्हा क्रीडा कार्यालय अकलूज वतिने सांगोला येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा परिषद आणि झोनल स्पर्धा यशस्वी रित्या संपन्न झाले. यामध्ये पुणे विभागाच्या जिंकलेल्या 7 संघाने भाग घेतला होता. ध्रुव ग्लोबल स्कूलच्या अंडर १७ मुलांचा संघाने मोठ्या चिकाटिने आणि उत्कृष्ट पासिंगच्या जोरावर जिल्हास्तरावर कांस्य पदक मिळविले. या टीममध्ये श्रीहरी पवित्रकार, श्रेयस अय्यर, निशांत पी, नील कोलते, अयान परमान, प्रणील घोषाल आणि सिध्दांत दिघे या खेळाडू होते.
अंडर १४ मुलींचा संघांने जिल्हास्तरीय विजेतेपद मिळविले.

या टीममध्ये जुई गोडबोले, अनया जैन, नेओराह माम, ईशा नारगुंदे, दिया सूद, अन्वी  बांग, तन्वी कोर्लेपर, अन्वी पोखरकर, अदिती सटले आणि हदिनी द्रविड यांनी शानदार खेळी खेळली. या टीम ने जिल्हास्तरीय विजेतेपद मिळवले आणि झोनल स्पर्धेसाठी पात्र ठरली. तसेच अंडर १४ मुलींच्या झोनल स्पर्धेत कांस्य पदक मिळविले. नुकतेच सोलापूर येथे झालेल्या झोनल स्पर्धेत या टीम ने अहमदनगरच्या टीम ला अवघ्या ३ गुणांनी पराभूत करत कांस्य पदक पटकावले. या टीम मधील जूई गोडबोले ची राज्य निवड चाचणीसाठी निवड झाली आहे. ही निवड म्हणजे ध्रुव ग्लोबल स्कूलला एक अभिमानाची बाब आहे.ध्रुव ग्लोबल स्कूलच्या तिन्ही संघांच्या यशामागे कोच पूनम बुटी आणि संकेत कुंभार याचे अमूल्य मार्गदर्शन आणि प्रेरणादायी प्रशिक्षणाचा मोठा वाटा आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
20.1 ° C
20.1 °
20.1 °
56 %
3.6kmh
24 %
Wed
27 °
Thu
25 °
Fri
26 °
Sat
26 °
Sun
24 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!