30.4 C
New Delhi
Saturday, June 7, 2025
Homeक्रीड़ामनू भाकेरने ऑलिम्पिकमध्ये रचला इतिहास

मनू भाकेरने ऑलिम्पिकमध्ये रचला इतिहास

भारतासाठी ’ही’ कामगिरी करणारी पहिली खेळाडू


नवी दिल्ली – भारताला पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पहिलं पदक मिळवून देणाऱ्या मनू भाकेरने मोठा इतिहास रचला आहे. मनू भाकेर आणि सरबज्योत सिंग या भारतीय जोडीने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला दुसरं पदक मिळवून दिलं आहे. मनू आणि सरबज्यो यांनी 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक नेमबाजी स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. भारतीय नेमबाजांनी कोरियन जोडीचा पराभव केला. यापूर्वी रविवारी, मनू भाकेर महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्यपदक जिंकून ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली होती, तर आता ती एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी स्वतंत्र भारताची पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.
भारतीय स्टार जोडीने दक्षिण कोरियाच्या ली ओन्हो आणि ओह ए जिन यांचा 16-10 अशा मोठ्या फरकाने पराभव केला. भारतासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. यापूर्वी कोणत्याच नेमबाजाने नेमबाजीत दोन पदके जिंकली नव्हती, मात्र मनूने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. अशाप्रकारे, एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी मनू भाकेर ही स्वातंर्त्यानंतरची पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.


पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी एकाच ऑलिम्पिकमध्ये भारताच्या कोणत्याही पुरुष किंवा महिला खेळाडूने 2 पदके जिंकलेली नाहीत. याशिवाय 2 पदके जिंकणारी ती पहिली भारतीय नेमबाज ठरली. याआधी पॅरिस ऑलम्पिकच्या दुसऱ्या दिवशी मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्यपदक पटकावले होते. मनू भाकेर गेल्या 20 वर्षांत वैयक्तिक स्पर्धेत ऑलिम्पिक अंतिम फेरीत पोहोचणारी भारताची पहिली महिला नेमबाज ठरली. यापूर्वी भारतीय महिला नेमबाज सुमा शिरूर होती, जिने 2004 मध्ये ग्रीक राजधानीत झालेल्या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर रायफल प्रकारात अंतिम फेरी गाठली होती.
मनूला आणखी एक पदक जिंकण्याची संधी
मनूपूर्वी भारतीय महिला नेमबाज सुमा शिरूरने अंतिम फेरी गाठली होती. 2004 मध्ये ग्रीसच्या राजधानीत झालेल्या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये त्यांनी 10 मीटर एअर रायफल प्रकारात अंतिम फेरी गाठली होती. मनूला आणखी एक पदक जिंकण्याची संधी आहे. ती 1 ऑगस्ट रोजी महिलांच्या 25 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत भाग घेणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
30.4 ° C
30.4 °
30.4 °
34 %
2kmh
0 %
Sat
41 °
Sun
45 °
Mon
46 °
Tue
45 °
Wed
45 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!