पुणे,_ महाराष्ट्र शासनाच्या MITRA मार्फत राबविण्यात येणार्या ‘महादेव प्रोजेक्ट’ या प्रतिष्ठित उच्च कार्यक्षमता क्रीडा विकास कार्यक्रमासाठी नांदे येथील ध्रुव ग्लोबल स्कूलचा विद्यार्थी सिद्धार्थ दुबे यांची निवड झाली आहे. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून फक्त ३० खेळाडूंची निवड करण्यात येते. सिद्धार्थच्या या यशाबद्दल ध्रव ग्लोबल स्कूलचे संचालक यशवर्धन मालपाणी व प्राचार्य संगीता राऊतजी यांनी अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्यात.
सिद्धार्थचे समर्पण, शिस्तबद्धता, कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे हे फळ आहे.‘महादेव प्रोजेक्ट’ या वैज्ञानिक प्रशिक्षण पद्धती, तज्ज्ञ मार्गदर्शन आणि सर्वांगीण खेळाडू विकासाच्या माध्यमातून उत्कृष्ट क्रीडा प्रतिभेची ओळख व घडण घडवणारा संरचित उपक्रम आहे. सिद्धार्थची ही निवड अत्यंत गौरवास्पद आहे. अमेय कलाटे व पार्थ सायकिया यांनी दिलेल्या प्रशिक्षणामुळे सिद्धार्थ याला यश मिळाले आहे.
हे यश सिद्धार्थच्या समर्पण, शिस्तबद्ध मेहनत आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे प्रतीक असून शैक्षणिक व क्रीडा उत्कृष्टतेचा समतोल राखण्यासाठी शाळेने दिलेल्या भक्कम पाठिंब्याचेही दयोतक आहे.


