12.1 C
New Delhi
Tuesday, January 13, 2026
Homeक्रीड़ाविराट कोहलीने घडवला इतिहास

विराट कोहलीने घडवला इतिहास

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‌’ही‌’ कामगिरी करणारा भारताचा पहिलाच खेळाडू

दुबई- विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक मोठे विक्रम आपल्या नावे केले आहेत. पण हे सर्व विक्रम विराटने बॅटने धावा करत आहेत. पण आता किंग कोहलीने क्षेत्ररक्षण करतानाही एक मोठा विक्रम आपल्या नावे केला, जो कोणत्याच भारतीय खेळाडूला आजवर करता आलेला नाही. विराट कोहलीने दुबईच्या मैदानावर फलंदाजी न करताही इतिहास घडवला आहे. विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक झेल घेणारा खेळाडू बनला आहे. त्याने राहुल द्रविडचा विक्रम मोडीत काढला आहे. रवींद्र जडेजाच्या चेंडूवर जोश इंग्लिसचा झेल घेत विराटने ही कामगिरी केली. टीम इंडियाच्या स्टार फलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत ३३६ झेल घेतले आहेत. उपांत्य फेरीसारख्या मोठ्या सामन्यात विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक फलंदाज जोश इंग्लिसचा झेल घेत मोठी कामगिरी आपल्या नावे केली. विराटने जागतिक क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली. विराटने आपल्या ५४९व्या सामन्यात भारतासाठी सर्वाधिक झेल टिपण्याची ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अलीकडेच विराट एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतासाठी सर्वाधिक झेल घेणारा खेळाडू ठरला होता, तर आता तो सर्व फॉरमॅटमध्ये ही कामगिरी करणारा भारतीय खेळाडू आहे. राहुल द्रविने आपल्या कारकिर्दीत एकूण ५०४ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि एकूण ३३४ झेल घेतले.


मोहम्मद अझरुद्दीनला मागे टाकत कोहलीने नुकताच वनडेमध्ये भारतासाठी सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये जागतिक क्रिकेटमध्ये आता सर्वाधिक झेल घेण्याच्या बाबतीत कोहली रिकी पॉन्टिंगच्या पुढे गेला आहे. कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १६१ झेल घेतले आहेत. विराट कोहली आपला ३०१वा वनडे खेळत असून या बाबतीत त्याने युवराज सिंगची बरोबरी केली आहे. युवराजनेही कारकिर्दीत तेवढेच एकदिवसीय सामने खेळले होते. विराटने या फॉरमॅटमध्ये १६१ झेल घेतले आहेत. विराट कोहलीने कसोटी फॉरमॅटमध्ये १२३ सामने खेळले असून २१० डावांमध्ये त्याने १२१ झेल घेतले आहेत. याशिवाय कोहलीने १२५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या ११७ डावांमध्ये ५४ झेल घेतले होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
12.1 ° C
12.1 °
12.1 °
62 %
1.5kmh
0 %
Tue
14 °
Wed
20 °
Thu
22 °
Fri
23 °
Sat
24 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!