पुणे : साईनाथ मंडळ ट्रस्टतर्फे दिल्या जाणाऱ्या श्री साई पुरस्कारासाठी जागतिक कीर्तीच्या नेमबाज अंजली भागवत यांची निवड करण्यात आली आहे.पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दि.6 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 6:30 वाजता श्री साईबाबा मंदिर परिसर, 615 बुधवार पेठ, भाऊसाहेब रंगारी पथ येथे आयोजित करण्यात आला आहे. पुरस्काराचे वितरण आमदार हेमंत रासने, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, भारतीय महिला हॉकी संघाच्या माजी कर्णधार रेखा भिडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती साईनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पियूष शहा यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.आतापर्यंत गिरीश कुलकर्णी, उमेश कुलकर्णी, राहुल देशपांडे, सलील कुलकर्णी, आनंद भाटे, सुरेश नाईक, पद्मश्री विजय घाटे, शर्वरी जमेनिस, विक्रम गायकवाड, भूषण गोखले, डॉ. भूषण पटवर्धन अशा मान्यवर व्यक्तींना प्रदान करण्यात आला आहे