IPL 2025 | भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगच्या वेळापत्रकात मोठा बदल झाला. हा बदल केवळ क्रिकेटच्या मैदानापुरता मर्यादित राहिला नाही, तर काही खेळाडूंच्या खासगी आयुष्यावरही त्याचा थेट परिणाम झाला आहे. अशाच एका खेळाडूचं नाव समोर आलं आहे – भारतीय फिरकीपटू कुलदीप यादव!
IPL 2025 ची अंतिम फेरी सुरुवातीला मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पार पडणार होती. पण 8 मे रोजी भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर स्पर्धा तात्पुरती स्थगित करण्यात आली. 17 मे पासून सामने पुन्हा सुरू झाले असले तरी, फायनलची तारीख पुढे गेल्याने कुलदीपच्या वैवाहिक आयुष्यालाही ‘रिव्हाईज शेड्युल’ पाळावं लागलं.

गुपचुप लग्न… पण गुपित फुटलं!
कुलदीप यादव आपलं लग्न गुपचुप पार पाडण्याच्या तयारीत होता. वधूबाबत अजूनही फारशी माहिती समोर आलेली नाही. तिचं नाव किंवा चेहरा अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, ती अभिनेत्री नसून इतर क्षेत्रातील आहे, असं खुद्द कुलदीपने काही महिन्यांपूर्वी सांगितलं होतं.
पण ‘गुपित’ फार काळ गुपित राहिलं नाही. माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याने एका मुलाखतीत कुलदीपच्या लग्नाचा उल्लेख करताच, ही बातमी लगेचच सोशल मीडियावर व्हायरल झाली.
IPL की लग्न? कुलदीपचा निर्णय स्पष्ट!
खेळाडूंसाठी देशासाठी खेळणं हे सर्वोच्च असतं. कुलदीप यादवनेही हेच दाखवून दिलं. IPLमधील निर्णायक सामन्यांमध्ये सहभागी होण्यासाठी त्याने स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याचा ‘महत्त्वाचा टप्पा’ थोडा पुढे ढकलला. आता त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे – ‘कधी वाजणार कुलदीपच्या लग्नाचा शंख?’