दोन आठवडे सुरू असलेल्या स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा होणार गौरव
पुणे- : पुण्याचे खासदार आणि केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने आयोजित खासदार क्रीडा महोत्सवाचा येत्या गुरुवारी (२७ नोव्हेंबर रोजी समारोप होणार आहे. खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत दोन आठवडे विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. बालगटापासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आणि महिलांपासून दिव्यांगांपर्यंत अशा सर्वांचा मोठा प्रतिसाद या स्पर्धेला लाभला. पुणे शहरातील २९ मैदाने आणि क्रीडा संकुलांमध्ये ३७ खेळांच्या विविध स्पर्धा या खासदार क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आल्या. त्यामध्ये तब्बल ४० हजारांहून अधिक आबालवृद्ध, दिव्यांग खेळाडूंनी सहभाग घेतला. आता हा महोत्सव अंतिम टप्पाकडे आला आहे.
या स्पर्धेतील विजेत्यांसाठी, त्यांचा कौतुकसोहळा आयोजित करण्यात आला आहे. गणेश कला क्रीडामंच येथे गुरुवारी सायंकाळी पाच वाजता या समारोप सोहळा पार पडणार आहे. या वेळी प्रसिद्धी कलाकार अक्षय कुमार उपस्थित राहणार आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असल्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

या वेळी खेलरत्न पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत, मुख्य समन्वयक मनोज एरंडे, ऑलिम्पियन रेखा भिडे, माजी कबड्डीपटू शांताराम जाधव, ऑलिम्पियन बॉक्सर मनोज पिंगळे, तेनसिंग नोर्गे पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे, माजी कबड्डीपटू शकुंतला खटावकर, ध्यानचंद पुरस्कार प्राप्त टेनिसपटू नितीन कीर्तने, सुरेखा द्रविड, श्रीरंग इनामदार या आजी-माजी खेळाडूंसह प्रकाश जावडेकर, धीरज घाटे, खा. मेधा कुलकर्णी, आ. भीमराव तापकीर, आ. सुनील कांबळे, आ. सिद्धार्थ शिरोळे, आ. हेमंत रासने, राजेश पांडे आदी नेते उपस्थित राहणार आहे.
या स्पर्धेत एकूण ३७ खेळांचा सहभाग करण्यात आला होता. यात क्रिकेट, फुटबॉल, खोखो, कबड्डी अशा सर्व खेळांचा समावेश होता. गेल्या महिन्याभरापासून शहरातील विविध मैदानांवर या स्पर्धा सुरू होत्या. विजेत्या प्रत्येक खेळाडूला रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. आता या विजेत्या खेळाडूंच्या पाठीवर कौतुकाची छाप द्यावी. त्यांचा कौतुक सोहळा पाहून इतरांनाही खेळाची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने समारोप सोहळा आयोजित करण्यात आला आहे, असे खासदार मोहोळ म्हणाले.
गेल्या महिन्याभरापासून स्पर्धा सुरू होत्या. खेळाडूंना एक चांगले व्यासपीठ मिळाले. नवोदित खेळाडूंना अनुभवी खेळाडूंचे मार्गदर्शन मिळाले. अनेक स्पर्धा चुरशीच्या झाल्या. अतिशय नेटके नियोजन या स्पर्धेचे करण्यात आले होते. आता या खेळाडूंचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या वर्षी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यातील विजेते उद्या आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करतील, तर आश्चर्य वाटायला नको. या स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्याचा प्रयत्न करावा, अशी अपेक्षा अंजली भागवत यांनी व्यक्त केली.


