पुणे,– भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाने मंजूर केलेल्या आंतरराष्ट्रीय हिंदी ऑलिंपियाड २०२४-२५ मध्ये पुण्यातील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. इयत्ता पाचवीच्या वरद मांडे ने स्पर्धेत पाचवा क्रमांक पटकावला, तर इयत्ता चौथीच्या आर्यंश कंसलने आठवा क्रमांक मिळवून शाळेचा आणि देशाचा अभिमान वाढविला.

स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल दोन्ही विद्यार्थ्यांना विशेष गुणवत्ता प्रमाणपत्र आणि प्रोत्साहन पुरस्कार देण्यात आला. हे यश त्यांच्या कठोर परिश्रम, समर्पण आणि हिंदी भाषेवरील प्रेमाचे फळ आहे.
या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना शाळेचे संचालक यशवर्धन मालपाणी म्हणाले, “आमच्या विद्यार्थ्यांनी या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत उत्कृष्ट भाषिक प्रतिभा दाखवली आहे. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे आणि आम्हाला विश्वास आहे की भविष्यातही ते जागतिक स्तरावर हिंदी भाषेला आदर मिळवून देत राहतील.”
मुख्याध्यापिका संगीता राऊतजी म्हणाल्या, “या मुलांचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे, जे त्यांना भाषा आणि साहित्यात रस वाढवण्यास प्रोत्साहित करेल.”
तसेच यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना प्रमाणपत्रे प्रदान केली.
हे यश केवळ शाळेसाठी अभिमानाची गोष्ट नाही तर समर्पण आणि वचनबद्धता असेल तर भाषेतील अडथळे देखील पार करता येतात हे देखील ते दर्शवते.