बीआरपीएसचा ८वीं मधिल विद्यार्थी
पुणे, – बेंगळुरू येथे झालेल्या सीआयएससीई राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत पुण्याती हिंजवडी येथील ब्ल्यू रिज पब्लिक स्कूल (बीआर.पी.एस.) च्या ८वीं फ मधील विद्यार्थी सिद्धांत साळुंखे ने प्रथम क्रमांक पटकविला. या कामगिरीमुळे त्याची निवड एसजीएफआय राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे. ही स्पर्धा डिसेंबरच्या अखेरीस झारखंड च्या रांची येथे पार पडणार आहे. त्यांची चिकाटी, परिश्रम व सातत्यपूर्ण प्रगती यामुळे तो सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
सिद्धांत साळुंखेच्या या यशाबद्दल व भावी जीवनाबद्दल मालपानी ग्रूपचे डॉ. संजय मालपाणी, संचालक यशवर्धन मालापाणी व प्रिन्सिपल सविता एच ट्रॅव्हिस यांनी शुभेच्छा दिल्यात.
आयोजित स्पधेर्र्त सिद्धांत ने ९ पैकी ७.५ गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. सिद्धांतने वयाच्या ६व्या वर्षी बुद्धिबळ खेळास सुरूवात केली. त्याने अलीकडेच गोव्यात पार पडलेल्या १३ वर्षाखालील राष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत चौथ क्रमांक मिळविला होता. त्यांची चिकाटी, परिश्रम व सातत्यपूर्ण प्रगती हे त्याच्या यशाचे गमक आहे.


