पुणे : ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय चेअरमन मा. सागर जी ढोले पाटील सर यांच्या मार्गदर्शनाने प्रेरणा घेऊन महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
पुणे महानगरपालिका शिक्षण विभाग व जिल्हा क्रीडा परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय जिल्हा स्तर ज्युदो स्पर्धा (सन २०२५-२६) बालेवाडी,पुणे येथे पार पडली. या स्पर्धेत ढोले पाटील जूनियर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, खराडी, पुणे येथील विद्यार्थीनी कु. गौरी गरुड हिने उत्तम कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य- प्रा .विठ्ठल गायकवाड सर, विभाग प्रमुख व सर्व अध्यापकांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले.