SPORT | पुणे -.ध्रुव ग्लोबल स्कूल, नांदे येथील अर्जुन जैन व सिद्धार्थ पॉल यांनी विभागीय टेबल टेनिस स्पर्धेतील अनुक्रमे १४ व १७ वर्षाखालील गटात पाचवा क्रमांक पटकावित उत्कृष्ट कामगिरी केली. स्पर्धा अहमदनगर (अहिल्यानगर) येथे आयोजित करण्यात आली होती.

हे यश मिळवताना त्यांनी संपूर्ण स्पर्धेत अप्रतिम कौशल्य, एकाग्रता आणि निर्धार दाखवला.सिद्धार्थ याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठीही निवड झाली आहे. या दोन्ही खेळाडूंना ख्यातनाम खेळाडू व प्रशिक्षक नचिकेत देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. विशेष म्हणजे नचिकेत हे स्वतः खुल्या गटातील खेळाडू असून त्यांनी ५० वर्षे वयोगटामध्ये रौप्य पदक पटकाविले. महाराष्ट्र राज्य मानांकन टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत त्यांचे हे यश नक्कीच गौरवपूर्ण आहे. या यशामुळे त्यांनी द्वितीय मानांकनावर झेप घेतली असून त्यांचा आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र ‘अ’ संघामध्ये समावेश झाला आहे.
या यशाबद्दल ध्रुव ग्लोबल स्कूलचे संचालक यशवर्धन मालपाणी व प्राचार्य संगीता राऊतजी यांनी सर्व खेळाडू तसेच प्रशिक्षकांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.


