पुणे, – एकाग्रता, लवचिकता आणि सुरेख सादरीकरणाच्या त्रि-संगमामुळे नांदे येथील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या योगपटू अद्विका जाधव व श्रावणी जाधव यांनी राजस्तरीय शालेय स्पर्धेत १९ वर्षाखालील रिदमिक पेअर योगासन प्रकारात कास्यपदक पटकावले आहे. यामुळे २०२५-२६ मध्ये होणार्या राज्यस्तरीय शालेय योगासन स्पर्धेसाठी त्या पात्र ठरल्या आहेत. या यशाबद्दल ध्रुव ग्लोबल स्कूलचे संचालक यशवर्धन मालपाणी व प्राचार्य संगीता राऊतजी यांनी सर्व योगपटू तसेच प्रशिक्षकांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्यात.
डीएसओ पुणे विभागातर्फे संगमनेर येथील मालपाणी लॉन्समध्ये योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा १४ व १९ वर्षाखालील विद्यार्थ्यांसाठी होती. या मध्ये विभिन्न शाळेतील अनेक योगपटूंनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेत नांदे येथील ध्रव ग्लोबल स्कूलच्या योगपटूंनी संतुलन, समरसता आणि उत्कृष्ट कौशल्याचे प्रभावी दर्शन घडविले.
१४ वर्षाखालील मुलांमध्ये आयोजित रिदमिक पेअर स्पर्धेत ध्रव ग्लोबल स्कूलचे योगपटू मेधांश बहादूर व निधीशा तारळकर यांनी आपली चमक दाखविली. तसेच आर्टिस्टिक सोलो मध्ये स्कूलचे अबीर जोशी ने आपली चुणूक दाखविली. विद्यार्थ्यांची एकाग्रता, लवचिकता आणि सुरेख सादरीकरणाने उपस्थित स्तब्ध झाले.
१९ वर्षाखालील मुलींमध्ये श्रावणी जाधव व अद्विका जाधव यांची राज्यस्तरीय शालेय योगासन स्पर्धा २०२५-२६साठी पात्र ठरल्या आहेत. स्कूलच्या सर्व योगपटूंची मेहनत, शिस्त आणि योगावरील निष्ठा राज्यस्तरावर झळकली आहे.
या सर्व योगपटूंना मार्गदर्शक व शिक्षक वैष्णवी आंद्रे, वैष्णव कोरडे व श्रध्दा चावरे यांनी बहुमूल्य मार्गदर्शन केले.
अद्विका व श्रावणी ला रिदमिक पेअर योगासनामध्ये कांस्यपदक
New Delhi
clear sky
10.6
°
C
10.6
°
10.6
°
43 %
1.6kmh
0 %
Thu
19
°
Fri
21
°
Sat
21
°
Sun
20
°
Mon
21
°


