पुणे, : भारतात चहाच्या वेळी होणाऱ्या अल्पोपाहाराला एक आधुनिक आणि आरोग्यदायक ट्विस्ट देत मालपाणीज् बेकलाईट ने नाविन्यपूर्ण चाय टोस्ट्स सादर केले आहेत. कंपनीच्या वतीने नुकतीच याबाबतीत अधिकृत घोषणा करण्यात आली.
स्वच्छता आणि पोषण यावर लक्ष केंद्रित करून चहाच्या वेळी अल्पोपाहार करण्याच्या पारंपारिक संकल्पनेला पुनरुज्जीवित करणे, तसेच आजच्या व्यस्त आणि आरोग्याबाबत जागरूक ग्राहकांसाठी चहाच्या वेळी उत्तम अनुभव देण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
मालपाणीज् बेकलाईट च्या २ टोस्ट असलेल्या सॅशेमुळे ही चिंता दूर होते. यामध्ये मिल्क चाय टोस्ट आणि ब्राउन चाय टोस्ट हे दोन प्रकार उपलब्ध आहेत. हे दोन्ही वैयक्तिकरित्या पॅक केलेले, स्वच्छ आणि उत्कृष्ट घटकांपासून बनवलेले असून चहाच्या वेळी वापरल्या जाणाऱ्या पारंपारिक स्नॅक ला एक आरोग्यदायक पर्याय ठरतात. मिल्क चाय टोस्ट च्या एका पॅकची किंमत ८ रुपये आणि ब्राउन चाय टोस्टची किंमत १० रुपये आहे.
मिल्क चाय टोस्ट हा दुधाने समृद्ध असून त्यामध्ये आवश्यक पोषक तत्वे आणि समृद्ध चव प्रदान करतो. तो परिपूर्णतेपणे भाजून त्याला कुरकुरीत बनविला जातो.
गहू, सोया पीठ आणि माल्ट पीठापासून बनवलेला ब्राउन चाय टोस्ट हा फायबरने समृद्ध असलेला पर्याय असून तो पचनक्रियेला मदत करतो. पौष्टिक आणि हलका नाष्ट्याच्या शोधात असलेल्यांसाठी हा आदर्श पदार्थ आहे.
आरोग्य आणि सोय याबद्दल आपली कटिबद्धता व्यक्त करताना मालपाणीज् बेकलाईट चे व्यवस्थापकीय संचालक श्री. सचिन मालपाणी म्हणाले “आमचे चहा टोस्ट तुमच्या चहाच्या वेळेला पूरक ठरतील. चव आणि स्वच्छतेशी तडजोड न करता आरोग्याबाबत जागरूक जीवनशैलीशी ते सुसंगत असतील, अशा रीतीने ते बनविलेले आहेत.
मोठ्या संख्येने व्यावसायिक चहाच्या ब्रेकच्या वेळेस झटपट तसेच पौष्टिक पर्याय शोधत आहेत. त्यांच्यासाठी चाय टोस्ट्सच्या रूपाने एक स्वादिष्ट आणि स्वच्छ पर्याय उपलब्ध झाला आहे. प्रवासासाठी सोयीचे असलेले हे टोस्ट्स भारतातील लोकप्रिय पेयाच्या प्रथेसाठी अत्यंत पूरक आहेत.
भारतात चहा पिण्याची परंपरा नेमाने पाळली जात असली तरी, अनेक लोकप्रिय स्नॅक रस्त्याच्या कडेला असलेल्या चहाच्या दुकानांवर जार मध्ये विकले जातात. त्यामुळे स्वच्छतेचे धोके उत्पन्न होतात आणि त्यात अनेकदा पौष्टिक मूल्यांचा अभाव असतो.
हे चाय टोस्ट सॅकरिन, ब्रोमेट्स आणि कृत्रिम रंगांपासून मुक्त आहेत. त्यामुळे चवीशी तडजोड न करता निरोगी स्नॅकिंग चा अनुभव मिळतो.
मालपानीज बेकलाईटचे नवीन चहा टोस्ट आता महाराष्ट्रातील सर्व दुकानांवर खरेदीसाठी उपलब्ध आहेत किंवा ते www.malpanifoods.com वेबसाइटवरून ऑर्डर करता येतील.