20.1 C
New Delhi
Tuesday, January 13, 2026
Homeज़रा हट केजागतिक माती दिनानिमित्त किसानकनेक्टचा ‘वन डे फॉर सॉईल' उपक्रम

जागतिक माती दिनानिमित्त किसानकनेक्टचा ‘वन डे फॉर सॉईल’ उपक्रम

माती संवर्धनासाठी ‘सीडपेपर’ उपक्रमाद्वारे’ नागरिकांना माती संवर्धनाचे आवाहन

मुंबई, : ताज्या भाज्या, फळे आणि खाद्यपदार्थांची प्रमुख ‘फार्म–टू–टेबल’ मार्केटप्लेस असलेल्या किसानकनेक्टने जागतिक माती दिनानिमित्त ‘वन डे फॉर सॉईल’ ही अनोखी मोहीम जाहीर करत नागरिक–ग्राहकांना ‘रोपणयोग्य सीड पेपर’चे वितरण करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. ‘वर्षाचे ३६४ दिवस माती आपली काळजी घेते, या एकाच दिवशी आपण मातीची काळजी घेऊ या!’ या संदेशासह किसानकनेक्टने ह्या उपक्रमातून माती किंवा मृदा पुनरुज्जीवनाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे आणि प्रत्येक नागरिकाने दैनंदिन जीवनात साध्या कृतींमधून कसा सकारात्मक प्रभाव घडवता येऊ शकतो हे समजावून सांगण्याचे ठरविले आहे. ही मोहीम किसानकनेक्टच्या ‘सॉईल-फर्स्ट’ धोरणाचा एक भाग असून ‘सशक्त माती, सशक्त शेतकरी आणि त्यातूनच आरोग्य-संपन्न ग्राहक’ हा जागतिक संदेश देणारी आहे.

माती संरक्षण आणि मातीच्या पुनरुत्पादनात सुरुवातीपासूनच आघाडीवर असलेल्या किसानकनेक्टने ५ डिसेंबर ते ७ डिसेंबर दरम्यान ‘जागतिक माती दिन’ उपक्रमाचा भाग म्हणून नागरिक–ग्राहकांना ‘प्लांटेबल सीड पेपर’ देण्याची मोहीम सुरू केली आहे, ज्याचा वापर नागरिकांनी त्यांच्या टेरेस गार्डनमध्ये, घराच्या मागील अंगणात, परिसरातील बागांमध्ये किंवा कोणत्याही शहरी समुदायिक जागेत करावा असा संदेश देण्यात आला आहे. ‘सीडपेपर’ उपक्रमाद्वारे प्रत्येक घराला पोसणाऱ्या मातीचे महत्त्व समजावे आणि माती संरक्षणात छोट्या प्रमाणात का होईना पण योगदान देता यावे हा उद्देश आहे. तीन दिवसांच्या या मोहिमेद्वारे किसानकनेक्टकडून ५०,००० पेक्षा अधिक नागरिकांपर्यंत पोहोचून माती जागरूकता निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

या मोहिमेचे महत्त्व सांगताना किसानकनेक्टच्या सह-संस्थापक आणि मुख्य व्यवसाय अधिकारी निधी निर्मळ म्हणाल्या, “जागतिक माती दिन हा पर्यावरणाला आपण दररोज जेवढे देणे लागतो त्याची परतफेड करण्याची संधी आहे. आमचा संदेश हा त्या मातीप्रती आदर व्यक्त करण्याची संधी आहे जी शेतकऱ्यांना आधार देते, कुटुंबांना अन्न देते आणि शहरांना समर्थ ठेवते. मातीचे आरोग्य हे किसानकनेक्टमधील आमच्या संपूर्ण इकोसिस्टमचे मूलभूत तत्त्व आहे आणि यावर्षीची थीमदेखील माती ही फक्त ग्रामीण शेतीसाठी नव्हे, तर शहरी जीवनासाठीदेखील अत्यंत महत्त्वाची आहे याची योग्य जाणीव करून देते. आमच्या ‘सीडपेपर’ उपक्रमाद्वारे आणि शेतकऱ्यांसोबत सुरू असलेल्या कृषीशास्त्र व पुनरुत्पादक कार्यक्रमांद्वारे आम्ही भविष्यातील पिढ्यांना पोषक ठरेल अशी माती जपण्यास वचनबद्ध आहोत.”

यंदाच्या जागतिक माती दिनानिमित्त यु.एन्.–एफ.ए.ओ.ने घोषित केलेली संकल्पना ‘हेल्दी सॉईल्स फॉर हेल्दी सिटीज’ ही शहरी पर्यावरणात मातीच्या भूमिकेवर प्रकाश टाकणारी आहे आणि किसानकनेक्टची मोहीम या संकल्पनेला पूरक ठरत शहरी जागेत नागरिकांचा सहभाग वाढवणारी आहे. शहरांचा विस्तार, अतिक्रमण, प्रदूषण, काँक्रीटीकरण यामुळे शहरी मातीचा ऱ्हास वेगाने सुरू आहे. शहरीकरणामुळे जमिनीचे दूषितीकरण, पोषक-चक्र बिघडणे, हिरव्या जागांचा ऱ्हास आणि मातीच्या परिसंस्थांचे नुकसान घडत आहे. भविष्यातील पिढ्यांसाठी सक्षम शहरे, स्वच्छ पाणी, हवामान संतुलन आणि शाश्वत-जीवनशैली सुनिश्चित करण्यासाठी शहरी मातीचे पुनरुज्जीवन अत्यावश्यक आहे, असे मतही निर्मळ यांनी व्यक्त केले.

किसानकनेक्ट महाराष्ट्रभरातील सात हजारांहून अधिक शेतकऱ्यांसोबत थेट काम करते, त्यांना शास्त्रीय व कृषीशास्त्राधारित मार्गदर्शन देऊन पारंपरिक शेतीपासून शाश्वत आणि पुनरुत्पादक शेतीपद्धतीकडे वळवते. त्यांच्या ‘सॉईल-फर्स्ट’ पद्धतीत नियमित माती परीक्षणाद्वारे पोषक तुटवडे, सेंद्रिय कार्बनचे प्रमाण, पीएच पातळीतील तफावत, सूक्ष्म पोषकांची कमतरता आदींचे विश्लेषण केले जाते. या चाचण्यांमधील निष्कर्षांवर आधारित कृषीशास्त्रज्ञ प्रत्येक शेतासाठी अचूक पीक – व्यवस्थापन योजना, पोषक वेळापत्रके आणि शाश्वत शेती इनपुट धोरणे तयार करतात. किसानकनेक्टने प्रशिक्षित कृषीशास्त्रज्ञांसह मजबूत ‘अॅग्री-क्लिनिक’ नेटवर्क तयार केले असून हे तज्ञ शेतकऱ्यांना मातीची सुपीकता, सिंचन कार्यक्षमता, पीक फेरपालटपद्धती, रोग व कीड व्यवस्थापन, अवशेषमुक्त शेतीआदी सुधारण्यात प्रत्यक्ष मार्गदर्शन करतात.

जागतिक पातळीवर जगातील ९५ टक्के अन्न मातीमधून प्राप्त होते, परंतु पृथ्वीवरील माती प्रचंड तणावाखाली आहे. दरवर्षी ३० अब्ज टन टॉपसॉईल क्षरणामुळे नष्ट होत आहे आणि जगातील एक तृतीयांश माती आधीच खराब झाली आहे. भारतातही राष्ट्रीयअभ्यासांनुसार ३० टक्के भारतीय मातीमध्ये सेंद्रिय कार्बन ०.५ टक्यांपेक्षा कमी आहे, तर ५० टक्के शेती क्षेत्रात पोषण असंतुलन आहे, जिथे दरवर्षी ५ अब्ज टन माती क्षरणामुळे वाहून जाते आणि सुमारे १.५ दशलक्ष टन पोषणद्रव्ये हरवतात, ज्यामुळे माती संरक्षण अधिकच अत्यावश्यक ठरते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
20.1 ° C
20.1 °
20.1 °
37 %
3.6kmh
36 %
Tue
20 °
Wed
20 °
Thu
22 °
Fri
23 °
Sat
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!