पंढरपूर – महाद्वार काल्याने कार्तिकी यात्रेची सांगता झाली. श्री.हरिदास, नामदास महाराज, पुजारी व इतर समाज यांचे मार्फत सदर काल्याचा उत्सव श्री. विठ्ठल सभामंडपात मोठ्या उत्साहात संपन्न झाल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.श्री विठ्ठल सभामंडपात पाच प्रदिक्षणा घालून, दहिहंडी फोडण्यात आली व त्यानंतर नामदेव पायरीवरून काला महाद्वाराकडे प्रस्थान झाला. यावेळी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री, लेखाधिकारी मुकेश अनेचा व विभाग प्रमुख संजय कोकीळ, अतुल बक्षी उपस्थित होते.कार्तिकी यात्रा कालावधीतील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराची संबंधित सर्व प्रथा व परंपराचे मंदिर समितीने कटाक्षपणे पालन केले आहे. तसेच दिनांक 20 नोव्हेंबर रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची प्रक्षाळ पूजा संपन्न होत आहे.
Our Visitor
0
9
0
1
2
0
Users Today : 165 Total views : 198993