24.2 C
New Delhi
Thursday, October 9, 2025
Homeज़रा हट केपुणेकरांनी अनुभवला पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त डीजे मुक्त दहिहंडीचा थरार

पुणेकरांनी अनुभवला पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त डीजे मुक्त दहिहंडीचा थरार

  • ऐतिहासिक लाल महाल चौकात तरुणाईचा जनसागर उधळला
  • ढोल ताशा, बॅन्ड, वरळी बिट्सचे पारंपारिक वाद्यांचा गजर….
  • राधेकृष्ण ग्रुपने दहिहंडी संघाने सात थर रचत फोडली हंडी

पुणे : प्रतिनिधी
गोविंदा रे गोपाळाचा जयघोष, ढोल ताशांचा मंगलमय गजर, महाकाल नृत्य आणि मुंबईतील प्रसिद्ध वरळी बिट्स यांच्या पारंपारिक संगीतावर थिरकणार्या तरुणाईचा उसळलेला जनसागर अशा उत्साही वातावरणात पुनीत बालन ग्रुप आयोजित २६ सार्वजनिक मंडळांची संयुक्त अशा दहीहंडीचा थरार पुणेकरांनी अनुभवला. ऐतिहासिक लाल महाल चौकात तुडुंब गर्दीसमोर राधेकृष्ण ग्रुपने सात थर रचत ही संयुक्त दहीहंडी फोडण्याचा बहुमान मिळवला. महाराष्ट्रातील पहिली डीजे मुक्त दहिहंडी साजरा करीत एक नवा आदर्श यानिमित्ताने पुनीत बालन ग्रुपने मांडला.
शहरातील २६ सार्वजनिक मंडळांनी एकत्र येऊन पुनीत बालन ग्रुपच्या माध्यमातून संयुक्त दहिहंडी उत्सव सुरू केला आहे. यावर्षीची संयुक्त दहीहंडी डिजे मुक्त साजरी करण्याची घोषणा पुनीत बालन केली होती. त्यामुळे या डीजे मुक्त दहीहंडीला पुणेकर कसा प्रतिसाद देणार याबाबत उत्सुकता होती. मात्र, ढोल ताशाचा गजर आणि वरळी बिटसने वाजविलेल्या संगीतावर हजारो पुणेकरांनी ठेका धरला आणि डीजे मुक्त दहिहंडीचा प्रयोग यशस्वी करत एक नवीन पायंडा पाडला. प्रभात बॅन्डच्या सुमधुर वादनाने या दहीहंडी कार्यक्रमाची सुरवात झाली. युवा वाद्य पथक, समर्थ पथक, रमणबाग आणि शिवमुद्रा या ढोल पथकांच्या जोरदार वादनाने या कार्यक्रमाची रंगत वाढविली आणि वरळी बिट्सच्या बॅंडने केलेल्या वादनाने अवघे वातावरण दंगून गेले.


यावेळी अभिनेता व दिगदर्शक प्रविण तरडे, अभिनेता हार्दिक जोशी, मराठी बिग बॉस फेम ईरिना यांच्यासह अनेक मराठी कलाकारांनी या उत्सवाला हजेरी लावली. यावेळी दहिहंडीच्या सलामी करीता वंदे मातरम दहिहंडी संघ, नटराज संघ, म्हसोबा संघ, भोईराज संघ, गणेश मित्रमंडळ संघ, गणेश महिला गोविंदा पथक, गणेश तोफखाना दहीहंडी संघ, नवज्योत ग्रुप संघ, इंद्रेश्वर संघ (इंदापूर),  शिवकन्या गोविंदा पथक (चेंबुर-मुंबई), शिवतेज ग्रुप, दहिहंडी संघ यांसारख्या अनेक गोविंदा पथकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. रात्री पावणे दहा वाजता राधेकृष्ण ग्रुपने सात थर रचत ही ऐतिहासिक दहीहडी फोडण्याचा मान मिळविला.या वर्षीचे दहीहंडी उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे उज्जैन येथील पारंपारिक ‘शिव महाकाल’ पथक होते, या पथकाच्या तालावर नाचत तरुणाईने जल्लोष केला. 


पुणेकरांनी डीजे मुक्त दहीहंडी ला उस्फूर्त प्रतिसाद देत हा उत्सव यशस्वी केल्याबदल मी मनापासून आभार व्यक्त करतो. गतवर्षी आम्ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी सार्वजनिक मंडळांची संयुक्त दहीहंडी उत्सव सुरू केला होता. यंदाच्या वर्षी डीजेमुक्त गणेशोत्सवाचा संकल्प केला असून, त्याच भूमिकेतून दहीहंडीमध्ये डीजेचा वापर टाळण्यात आला. त्यामुळे ध्वनी प्रदूषण कमी झाले आणि पारंपारिक वाद्यवादकांनाही रोजगार मिळाला.

– पुनीत बालन, अध्यक्ष, 

पुनीत बालन ग्रुप/ विश्वस्त, उत्सव प्रमुख, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
24.2 ° C
24.2 °
24.2 °
62 %
1.8kmh
0 %
Thu
30 °
Fri
32 °
Sat
33 °
Sun
33 °
Mon
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!