पुणे – शालेय मुलांच्या सर्जनशील प्रतिभेला व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने, नांदेड येथील अभिनव चित्रशाळेने नुकतेच राज्यस्तरीय बाल चित्रकला परीक्षा २०२५ बोध आयोजित केली होती. ज्यामध्ये नांदे येथील ध्रुव ग्लोबल स्कूलची हुशार विद्यार्थिनी काव्या टोपीवाला हिने तिच्या सर्जनशील प्रतिभेचे आणि कलेप्रति असलेल्या समर्पणाचे उत्तम प्रदर्शन करुन प्रथम क्रमांक पटकावला आहे.
ध्रुव ग्लोबल स्कूलचे संचालक यशवर्धन मालपाणी, प्राचार्य संगीता राऊतजी आणि सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी तिच्या यशाबद्दल अभिनंदन केले. यावेळी यशवर्धन मालपाणी म्हणाले की, तिच्या या अद्भुत कामगिरीबद्दल तिचा अभिमान आहे आणि तिला उज्ज्वल भविष्यासाठी आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

परीक्षेत विद्यार्थ्यांना बैल घेऊन जाणारे शेतकरी, आकाशात विमान आणि खाली जंगल आणि फळ विक्रेता व त्याचा ग्राहक या विषयांवर चित्रे काढायची होती. ज्यामध्ये काव्याने बैल घेऊन जाणार्या शेतकर्याचे चित्र काढले आणि तिच्या रंगाची जादू दाखवून प्रथम स्थान पटकाविले. काव्याच्या या कामगिरीने शाळेचाच नव्हे तर संपूर्ण परिसराचा अभिामना वाढविला आहे. शाळेने वेळोवेळी तिचे फोटो डिस्प्ले बोर्डवर लावले होते, जे तिला सतत प्रेरणा देत राहिले. तिच्या कठोर परिश्रमाने आणि शिक्षकांच्या आणि शाळेच्या पाठिंब्याने तीने ही उंची गाठली आहे.