“भाऊ, ह्या रिक्षाचालकाचा गणवेश कुठे आहे?” — अशा शंका आता पुणेकरांना रस्त्यावर सहज विचारता येणार आहेत! कारण पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) RTO नुकताच आदेश काढला आहे की, शहरातील सर्व रिक्षाचालकांना पांढरा शर्ट, खाकी पँट आणि ओळखपत्र घालणं अनिवार्य असणार आहे.
आरटीओच्या तपासणीत लक्षात आलं की अनेक रिक्षाचालक(Pune transport) गणवेश आणि ओळखपत्र वापरत नाहीत, त्यामुळे प्रवाशांना गैरसोयींना तोंड द्यावं लागतं. हा प्रकार थांबवण्यासाठी महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 मधील तरतुदीची आठवण करून देत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी पत्र काढलं आहे.
जर कुणी रिक्षाचालक या आदेशाचं पालन करताना आढळला नाही तर त्याच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार थेट कारवाई केली जाणार आहे. यासाठी खास तपासणी पथकंही रस्त्यावर उतरवली जाणार आहेत.
आरटीओकडून सांगण्यात आलं की, “गणवेश, ओळखपत्र आणि वैध कागदपत्रांची तपासणी विशेष मोहिमेमार्फत केली जाईल. नियम मोडल्यास कुणालाही सवलत मिळणार नाही.”या नव्या मोहिमेमुळे पुणेकरांना अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह रिक्षा सेवा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 21 (18) अन्वये, रिक्षाचालकांनी प्रवाशांना सेवा पुरवताना नियमीत गणवेश व ओळखपत्र परिधान करणे अनिवार्य आहे. मात्र, अनेक रिक्षाचालक या नियमाचे पालन करत नसल्याचे पुणे आरटीओच्या तपासणीत आढळले. त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांच्या आदेशानुसार हे नवीन परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
भोसले यांनी पत्रात नमूद केले आहे की, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांवर मोटार वाहन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल. यासाठी आरटीओच्या वायुवेग पथकांमार्फत विशेष तपासणी मोहीम राबवली जाणार असून, यासाठी स्वतंत्र पथके नियुक्त केली जाणार आहेत.
या विशेष मोहिमेत रिक्षाचालकांच्या गणवेश, ओळखपत्र (Pune auto rickshaw uniform rule)तसेच वाहनाची वैध कागदपत्रे यांची तपासणी केली जाईल. नियमभंग आढळल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यामुळे सर्व रिक्षाचालकांनी नियमांचे पालन करून आपली सेवा सुरु ठेवावी, असे आवाहन आरटीओने केले आहे.शहरातील प्रवाशांची सुरक्षितता, पारदर्शकता व शिस्तबद्ध सेवा सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.