पुणे – वसू इव्हेंट यांच्या वतीने भारतातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय फुलोत्पादन, बागायती हॉर्टिकल्चर, फ्लोरीकल्चर, आर्बोरीकल्चर, ॲग्रीप्रेन्योरशिप आणि प्रगत प्रक्रिया तंत्रज्ञानावर आधारित प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार हेमंत रासने यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी वसंत रासने, विजय रासने, सोनिया कोंजेटी, डेनीस कोल्पाकोप रशिया, फेड्रिक जर्मनी आर्मिन राउथ – जर्मनी, डॉ. शशिकांत नहिरे, , सोपानराव माने माहिपालसिंह राणा, सचिन ब्राह्मणकर, विजय शिंदे महाराष्ट्र नर्सरी असो. अध्यक्ष शशिकांत चौधरी हे देखील उपस्थितीत होते.

सदरील प्रदर्शन नवीन कृषी महाविद्यालय मैदान, सिंचननगर पुणे येथे रोजी सकाळी १०. ते ७ वाजेपर्यंत खुल्ले असणार आहे. यामध्ये जगभरातील १२ देश तसेच भारतातील २० राज्यांनी सहभाग घेतला आहे. या हॉर्टीकल्चर प्रदर्शनात विविध प्रकारच्या वनस्पती, फुलांचे नवे प्रकार, गार्डनिंगसाठी अत्याधुनिक साधनसामग्री आणि तंत्रज्ञान पाहायला मिळणार आहे.

देश-विदेशातील शेतकरी, बागायती तज्ञ, व्यावसायिक तसेच संशोधक या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. १३ तारखेपासून सुरु झालेले प्रदर्शन हे १६ तारखेपर्यंत नागरिकांसाठी खुले आहे. तरी जास्तीत जास्त पुणेकरांनी सदरील प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी असे आवाहन वसू इव्हेंट यांच्या वतीने करण्यात आले आहे.येत्या दोन दिवसात शेतकरी व उद्योजकांना मार्गदर्शन सत्रेही आयोजित केली जाणार आहेत. या प्रदर्शनातून बागायती क्षेत्रातील रोजगार व व्यवसायाच्या नव्या संधींचे द्वार उघडणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. प्रदर्शन दरम्यान हॉर्टीकल्चर क्षेत्रातील नवीन ट्रेंड्स, तंत्रज्ञान आणि बाजारपेठेतील संधी यांवर विशेष चर्चा सत्रे होणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन डॉ. निशिकांत धुमाळ यांनी केले.

हे प्रदर्शन फुलांचीच नाही, तर आत्मनिर्भर भारताची आणि हरित भविष्यातीलही सुंदर झलक दाखवते – आमदार हेमंत रासने”सहाव्या जागतिक दर्जाच्या हॉर्टीकल्चर प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्या देशातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील फुलोत्पादन व बागायती क्षेत्राला नवा आयाम मिळत आहे. अशा प्रदर्शनांमुळे शेतकरी, उद्योजक, संशोधक आणि युवा वर्ग यांना एकत्र येऊन नव्या तंत्रज्ञानाची ओळख करून घेण्याची आणि बाजारपेठेतील संधींचा लाभ घेण्याची सुवर्णसंधी मिळते. हरित अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीला चालना देण्यासाठी या उपक्रमाचे मोल अमूल्य आहे. हे प्रदर्शन फुलांचीच नाही, तर आत्मनिर्भर भारताची आणि हरित भविष्यातीलही सुंदर झलक दाखवत आहे.


