14.1 C
New Delhi
Thursday, November 27, 2025
Homeज़रा हट के'सीएसजे सुवर्ण सफर’ या उपक्रमाचा शुभारंभ

‘सीएसजे सुवर्ण सफर’ या उपक्रमाचा शुभारंभ

आता आलिशान बसमध्ये ग्राहकांना लुटता येणार दागिने खरेदीचा आनंद

पुणे, : १८२७ पासून गुणवत्ता व शुद्धतेचा वारसा जपणाऱ्या चंदुकाका सराफ ज्वेल्सच्या वतीने ‘सीएसजे सुवर्ण सफर’ या ज्वेलरी ऑन व्हील्स उपक्रमाची घोषणा चंदुकाका सराफ ज्‍वेल्‍सचे संचालक सिद्धार्थ अतुल शहा यांनी झालेल्या पत्रकार परिषदेत केली.

परंपरा व नवकल्पनांचा संगम घडवून आणत आपल्या ग्राहकांना नेहमीच काहीतरी वेगळे देण्याचा चंदुकाका सराफ ज्वेल्सचा कायमच प्रयत्न असतो, याच परंपरेला पुढे नेत ‘सीएसजे सुवर्ण सफर हा उपक्रम हाती घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेआधी ‘सीएसजे सुवर्ण सफर’ या उपक्रमाचा शुभारंभ चंदुकाका सराफ ज्वेल्सचे संचालक अतुल शहा व संगीता शहा यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. चंदुकाका सराफ ज्वेल्सच्या संचालिका स्वीटी बागी या देखील या वेळी उपस्थित होत्या.

या उपक्रमाविषयी अधिक माहिती देताना सिद्धार्थ अतुल शहा म्हणाले की, “सीएसजे सुवर्ण सफर या उपक्रमाअंतर्गत आम्ही एका आलिशान बसचे रुपांतर संपूर्णपणे सुसज्ज अशा दागिन्यांच्या शोरूम मध्ये केले असून. या बसमध्ये ग्राहकांना दुकानातील खरेदीचा आनंद त्यांच्या घर अथवा ऑफिसच्या जवळ देखील घेता येणे शक्य होणार आहे. या फिरत्या शोरूममध्ये सोने, हिरे आणि चांदीच्या दागिन्यांचे मनमोहक प्रकार खरेदीसाठी उपलब्ध असून चंदुकाका सराफ ज्वेल्सच्या अनुभवी तज्ज्ञांच्या उपस्थितीत शोरूम प्रमाणेच ग्राहकांना विश्वासार्ह व सहज दागिने खरेदीचा अनुभव या आलिशान बसमध्ये देखील घेता येईल.

आज २२ सप्टेंबर, २०२५ पासून ‘सीएसजे सुवर्ण सफर’ ची यात्रा महाराष्ट्रातील ग्रामीण भागांतील गावांपासून सुरू होत असल्याचे सांगत सिद्धार्थ शहा पुढे म्हणाले की, या उपक्रमामुळे ज्या ग्राहकांना आमच्या पर्यंत पोहोचणे शक्य नाही अशांपर्यंत आता आम्ही स्वत: पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहोत. शिवाय या उपक्रमाद्वारे ग्राहकांनाही सोने, हिरे व चांदीच्या दागिन्यांची आधुनिक डिझाईन्स व अप्रतिम व्हारायटी असलेले असे आमचे नवे एक्सक्लुसिव्ह कलेक्शन मनसोक्त पाहता येईल.

याशिवाय १८२७ पासून परंपरा व विश्वासाचा वारसा जपणारे चंदुकाका सराफ ज्वेल्स यंदाच्या दसरा दिवाळीत आपल्या ग्राहकांसाठी खास ग्रँड फेस्टिव्ह ऑफर देखील घेऊन आले आहेत. सणासुदीच्या उत्साहात भर घालत भव्य दसरा दिवाळी ऑफर या फिरत्या शोरूममध्येही लागू राहणार आहे. दसरा दिवाळीच्या या प्रकाशमय वातावरणात चंदुकाका सराफ ज्वेल्स मधून केलेली प्रत्येक खरेदी अधिकच झगमगती आणि संस्मरणीय ठरेल असा विश्वास यावेळी सिद्धार्थ शहा यांनी व्यक्त केला. ‘सीएसजे सुवर्ण सफर’ या अभिनव उपक्रमाद्वारे चंदुकाका सराफ ज्वेल्स ग्राहकांपर्यंत पोहोचत आहेतच शिवाय आपल्या परंपरेचा वारसा, विश्वास आणि दागिन्यांचे सौंदर्य देखील ते ग्राहकांच्या दारात आणून ग्राहकांची सोय करीत आहे हे विशेष.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
14.1 ° C
14.1 °
14.1 °
72 %
0kmh
0 %
Wed
20 °
Thu
25 °
Fri
26 °
Sat
26 °
Sun
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!