पुणे: राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते कडबनवाडी येथील गवताळ प्रदेशामध्ये जिप्सीमधून करण्यात येणाऱ्या सफारी उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. नागरिकांनी या सफारीचा लाभ घेण्याचे त्यांनी आवाहन केले.
यावेळी वनसंरक्षक आशिष ठाकरे, उपवनसंरक्षक महादेव मोहिते,सहायक वनसंरक्षक मंगेश ताटे, इंदापुरच्या वनपरिक्षेत्र अधिकारी भाग्यश्री ठाकूर आदी उपस्थित होते.
श्री. भरणे यांच्या हस्ते पुणे वनविभागाकडून एकूण ३ जिप्सीधारकांना प्रत्येकी १ लाख रुपयाच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले तसेच कडबनवाडी गवताळ प्रदेशाच्या लोगोचे अनावरणही करण्यात आले.
श्री. भरणे यांनी कडबनवाडी येथील गवताळ प्रदेशाची स्वतः सफारी केली. नागरिकांनीही या सफारीचा आनंद घेऊन याबाबत इतर नागरिकांपर्यंत माहिती पोहचवावी, असे आवाहन श्री. भरणे यांनी केले.
यावेळी कडबनवाडी वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जलभूषण भजनदास पवार, सदस्य दादासाहेब जाधव, सरपंच संगिता गावडे, उपसरपंच कडबनवाडी, अॅड. सचिन राउत, फ्रेंडस ऑफ नेचर क्लब, निमगाव केतकी व त्यांचे सदस्य आणि परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.