पुणे : संत श्री शंकर महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित ‘योगीराज’ या भव्य रंगावली प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २४ ते २७ सप्टेंबर दरम्यान सकाळी १० ते संध्याकाळी ७ प्रयंत बालगंधर्व कलादालनात रंगावली प्रदर्शन होणार असून सुप्रसिद्ध फलक रेखाटनकार, सुलेखनकार , रांगोळीकार अमित भोरखडे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती आयोजक रंगावलीकार शारदा अवसरे यांनी दिली.
उद्घाटनाला प्रमुख उपस्थिती श्री सद्गुरु शंकर महाराज समाधी ट्रस्टचे ट्रस्टी तसेच रंगावलीकार अक्षय शहापुरकर आणि जगदीश चव्हाण, आयोजक रंगावलीकार शारदा अवसरे उपस्थित राहणार आहेत.
शारदा अवसरे म्हणाल्या, प्रदर्शनात शंकर महाराज यांच्या विविध कथांवर आधारित २० भक्ती कथा रांगोळ्यांच्या माध्यमातून पाहता येणार आहेत. श्रीरंग कला दर्पण फाउंडेशनचे अक्षय शहापूरकर यांनी प्रदर्शनासाठी विशेष सहकार्य केले आहे.