पिंपरी- चिंचवड – मोरया शिक्षण संस्था, व्ही.के. माटे हायस्कुल येथे शिकणारी आर्या केतन करकरे इ. १० वी (अ) ९६ टक्के गुण मिळवून प्रशालेत प्रथम क्रमांक मिळवला आहे. तिला मराठी विषयात ९०, संस्कृतमध्ये १०० पैकी १००,इंग्रजी -९५, गणित-८५, विज्ञान आणि तंत्रज्ञान -९८, समाजशास्त्र- ९७ असे गुण प्राप्त करुन तिने प्रशालेत प्रथम क्रमांक मिळवला आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. आर्याला प्रकाश क्लासेसचे कुलकर्णी सर, केतकी मॅम,सर्वेश सर,स्वाती मॅम,पाटील सर आणि माटे शाळेच्या प्राचार्या पिसोळकर मॅम आणि सर्व शिक्षक वर्ग व आई-बाबा यांच्यासह सर्वांचे मार्गदर्शन लाभले आहे. यावेळी या यशाबद्दल बोलताना ती म्हणाली की, मला पुढे जावून शास्त्रज्ञ होण्याचे स्वप्न आहे. त्या दृष्टीने पुढे अभ्यासात सातत्य राखणार असल्याचे यावेळी सांगितले.प्रशालेचा एकूण 99.52 टक्के निकाल लागला आहे.
तर दुसरीकडे पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड येथील हायस्कुल मधील प्रथमेश विशाल तुपसोंदर्य या विद्यार्थ्यांने ३५ टक्के गुण मिळवले आहे. त्याला प्रत्येक विषयात ३५ मार्क मिळाले आहे.
