राज्यात मुंबईसह पुणे, ठाणे, सातारा, कोल्हापूरसह अनेक भागांत नदी- नाल्यांना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले. यातच सोलापूर येथील उजनी धरण ओसांडून वाहत आहे. या धरणातून आज सकाळी २० हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात आला. पाण्याची पातळी वाढल्याने ४० हजार क्यूसेक गतीने पाणी नदी पात्रत सोडले जाणार आहे. यामुळे पंढरपुरासह काही गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्या आहेत.
उजनी धरणातून भीमा नदीत हा विसर्ग सोडण्यात येत असल्याने परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून व्यास नारायण वसाहतीमधील ५०० जणांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यात असाच पाऊस सुरू राहिल्यास पुढच्या दोन दिवसात पंढरपूर शहर व नदीकाठच्या गावांना पुराचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. सकाळी उजनी धरणाने ९० टक्क्यांची पातळी गाठली असताना वरुन धरणाकडे येणाऱ्या पाण्याची अवाक एक लाख क्युसेकपर्यंत पाण्याचा विसर्ग हा करण्यात आला. सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी ठरलेले उजनी धरण १०० टक्के भरल्याने आता सोलापूर जिल्ह्यासह , अहमदनगर , उस्मानाबाद आणि पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.