31.5 C
New Delhi
Tuesday, July 8, 2025
Homeताज्या बातम्याग्रुप बुकिंग केल्यास थेट गावातून पंढरीला बससेवा

ग्रुप बुकिंग केल्यास थेट गावातून पंढरीला बससेवा

आषाढी वारीसाठी एसटीच्या ५ हजार जादा फेऱ्या

आषाढी यात्रेसाठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळाने आनंदाची बातमी दिली आहे. विविध आगारांतून पंढरपूरला यात्राकाळात ५ हजार विशेष बस सोडण्याचे नियोजन महामंडळाने केले आहे. विशेष म्हणजे राज्यातील कोणत्याही गावातून ४० अथवा त्या पेक्षा अधिक भाविकांनी ग्रुप बुकिंग केल्यास त्यांना गावातून थेट पंढरपूरला बससेवा पुरवण्यात येणार आहे. स्पेशल एसटी बुकिंग करण्यासाठी भाविक प्रवाशांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधण्याचे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे.

दरवर्षी आषाढी वारीला (AshadhiEkadashi) राज्यभरातून लाखो वारकरी विठु नामाचा जागर करत पंढरपुरला विठुरायाच्या दर्शनाला येतात. अनेक प्रवासी स्वत:च्या खाजगी वाहनाने, रेल्वेने, एसटीने अथवा विविध पालखी सोहळ्याबरोबर पायी चालत दिंडीने पंढरपुरात दाखल होत असतात. एमसटी महामंडळाकडूनही दरवर्षी अतिरिक्त बसफेऱ्या सोडल्या जातात. यंदा गावातून थेट पंढरपूर अशी बस सेवा उपलब्ध करून दिल्याने भाविकांची मोठी सोय झाली आहे. ग्रुप बुकिंगसाठी ४० किंवा त्याहून अधिक प्रवासी असल्यास गावातून बससेवा पुरवली जाणार आहे. जादा बस फेऱ्यांमध्येही ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास देणारी ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’, महिलांसाठी ५० टक्के तिकीट दरात सुट देणारी ‘महिला सन्मान योजना’ आदि राज्य सरकारच्या सवलत योजना लागू राहतील, असे महामंडळाने स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
broken clouds
31.5 ° C
31.5 °
31.5 °
60 %
2.2kmh
59 %
Mon
31 °
Tue
38 °
Wed
35 °
Thu
35 °
Fri
35 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!