चिंचवड : पिंपरी चिंचवडमधील सर्व नागरिकांच्या आवडीचे ‘ बॉण्ड ‘ आयोजित ‘ झेप’ प्रदर्शन ’ या वर्षी १९ व २० ऑक्टोबर २०२४ ला चिंचवडे लॉन्स, चिंचवड येथे सकाळी १० ते रात्रौ ९ वाजेपर्यंत आयोजित केले आहे.सर्व लहान व मोठ्या उद्योजकांना एक मोठे प्लॅटफॉर्म मिळावा, त्यांच्या उद्योगांना चालना मिळावी या हेतूने दरवर्षी दिवाळीपूर्व हे प्रदर्शन आयोजित केले जाते. यामध्ये १०० हून अधिक भव्य स्टॉल असणार आहेत.नेहमीच झेप प्रदर्शनास ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळतो. यंदाच्या वर्षीहि खाद्य पदार्थांपासून ते कपड्यांपर्यंत सर्व काही एका छताखाली उपलब्ध होणार आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असेल.उदघाटन समारंभासाठी प्रसिद्ध उद्योजिका मा. मधुरा दिवाण, फेसबुक खादाड खाऊ ग्रुपच्या संस्थापिका मा. मधुरा पेठे, आपला आवाज आपली सखीच्या संचालिका मा. संगीता तरडे, फेसबुक – पिंपरी-चिंचवड ग्रुपच्या संस्थापिका मा. पूनम परदेशी, ऊर्जा आयुर्वेदच्या संचालिका मा. डॉ प्रेरणा बेरी, टोणगावकर हॉस्पिटलच्या संचालिका मा. डॉ दिपाली टोणगावकर, प्रोलक्स वेलनेस अँड प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या संस्थापिका मा. डॉ. प्रचिती पुंडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.दिवाळीच्या निमित्ताने महिला वर्गांमध्ये खरेदीचा उत्साह मोठ्या प्रमाणात असतो या पार्श्वभूमीवर या प्रदर्शनात खरेदी करण्याची पर्वणीच ग्राहकांना मिळणार असल्याचे आयोजकाडून सांगण्यात आले.
प्रदर्शनात अनेक सोयी सुविधा उपलब्ध होणार आहे. प्रवेश व पार्किंग मोफत असणार आहे.
तरुणाईच्या आवडते ३६० डिग्री,सेल्फी कॉर्नर,सेल्फी बूथ तर असेलच त्याच बरोबर नेल आर्ट, मेहंदी अश्या ॲक्टिव्हिटी ही असणार आहेत. दिवाळीसाठी लागणारी प्रत्येक वस्तू इथे रास्त भावात मिळणार आहे. याच बरोबर खूप मोठी खाऊ गल्ली हे या प्रदर्शनाचे आकर्षण असणार आहे.
सामाजिक बांधिलकीसाठी ५ स्टॉल
गोंद आदिवासी नागझरा जंगल,भंडारा येथे बनवलेल्या अनेक वस्तू , संपूर्ण बांबू केंद्र, मेळघाट या संस्थेच्या बांबूच्या वस्तू , ऊर्जा प्रतिष्ठान भोसरीच्या अंध मुलांनी रंगवलेल्या पणत्या, पुनरुत्थान गुरूकुलम, चिंचवड या संस्थेमधील मुलांनी बनवलेल्या वस्तू तसेच छात्र प्रबोधन,पुणेचा स्टॉल हे या प्रदर्शनाचे खास वैशिष्ट आहे. उत्तम दर्जाच्या वस्तू खरेदी करण्यासाठी सर्वांनी प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन बॉण्ड ग्रुपने केले आहे.
दिवाळीनिमित्त ”झेप” चे भव्य-दिव्य प्रदर्शन
सर्व प्रकारच्या वस्तू आणि खाद्य पदार्थांची रेलचेल
RELATED ARTICLES
New Delhi
overcast clouds
27.3
°
C
27.3
°
27.3
°
88 %
3.7kmh
100 %
Mon
27
°
Tue
35
°
Wed
35
°
Thu
36
°
Fri
34
°