पुणे : अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट च्या वतीने मंडईतील बुरुड आळीत आयोजित म्हसोबा उत्सवात दीप अमावस्येनिमित्त ११०० दिव्यांचा दीपोत्सव साजरा करण्यात आला. फिरत्या रंगीबेरंगी दिव्यांची व फुलांची आकर्षक आरास यानिमित्ताने मंदिराला करण्यात आली होती. तसेच ११०० दिवे यावेळी प्रज्वलित करण्यात आले. Deep
प.पू. कालीपूत्र कालीचरण महाराज Kalicharan Maharaj यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी अंकुश काकडे, बाळासाहेब दाभेकर, विश्राम देव, ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. वेंकीज उद्योग समूहाचे संचालक बालाजी राव आणि माणिकचंद उद्योग समूहाचे चेअरमन प्रकाश धारीवाल यांचे उत्सवाला विशेष मार्गदर्शन मिळाले आहे.
कालीचरण महाराज यांचे पाद्यपूजन करून ट्रस्टतर्फे सन्मानचिन्ह व महावस्त्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. रंगीबेरंगी फिरत्या दिव्यांचे मनोहारी दृश्य मोबाईलमध्ये कैद करण्याकरिता देखील भाविकांनी मोठी गर्दी केली. उत्सवात अन्नदान सेवा, भजनी मंडळाचे कार्यक्रम, ढोल-ताशा वादन देखील सुरु आहेत. अबोली सुपेकर यांनी सूत्रसंचालन केले.