चिंचवड- भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी व महाराष्ट्राचे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे या दोन्ही जेष्ठ नेत्यांच्या ‘जयंती’ निमित्त भाजपा नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे यांच्या वतीने सर्व चिंचवडकर नागरिकांसाठी ‘12 डिसेंबर ते 25 डिसेंबर या कालावधीत’ लोकोपयोगी योजनांच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून सदर उपक्रम नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे यांचे जनसंपर्क कार्यालय, शेडगे बिल्डिंग, मनकर्णिका औषधालया शेजारी, पडवळ आळी, चिंचवडगाव. येथे राबविण्यात येत आहे.
या मध्ये ’आयुष्मान वय वंदना कार्ड हे सामाजिक-आर्थिक स्थिती न पाहता 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना पाच लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण प्रदान करते. हे कार्ड सुमारे 2000 वैद्यकीय प्रक्रियांचे उपचार देते आणि कोणत्याही प्रतीक्षा कालावधीशिवाय पहिल्या दिवसापासून सर्व विद्यमान आजारांना कव्हर करते.! या साठी लागणारी कागदपत्रे 1) आधारकार्ड2) आधारकार्डला लींक असलेला मोबाईल नंबर3) स्वतः व्यक्ती असणे आवश्यक.तसेच नविन मतदार नोंदणी करीता १) आधारकार्ड २) पॅनकार्ड ३) घरच्या पत्त्याचा पुरावा (पुढील पैकी एक) बॅंक पासबुक, लाईट बील, गॅस पावती कार्ड असणे आवश्यक याच बरोबर मोफत मतदान स्मार्ट कार्ड साठी 1) प्रभाग क्रमांक 18 चिंचवडगाव मतदार यादीत नाव असणे आवश्यक.सदर उपक्रम ‘हे 12 डिसेंबर ते 25 डिसेंबर या कालावधीत दररोज सकाळी 9 am ते दुपारी 1.30 व दुपारी 4.30 ते रात्री 8.30 वाजेपर्यंत.असतील जास्तीत जास्त नागरिकांनी सदर उपक्रमाचा लाभ घ्यावे असे आवाहन माजी नगर सेवक ॲड.मोरेश्वर शेडगे यांनी केले.