पुणे – पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नातेवाईकांनी प्रेमाला विरोध केल्यानं प्रियकराने प्रेयसीचा खून केला आणि त्यानंतर स्वत: आत्महत्या केली आहे. पुण्यातील हडपसर भागातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मोनिका कैलास खंडारे असे खून झालेल्या तरुणीचे नाव तर आकाश अरुण खंडारे आत्महत्या केल्याचे नाव आहे.
मोनिका आणि आकाश मूळचे अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्याचे. दोघे नातेवाईक असून, त्याचे प्रेमसंबंध होते. मोनिका आणि आकाशच्या प्रेमसंबंधाला कुटुंबीयांचा विरोध होता. आकाश शेती करायचा तर मोनिका नोकरी करत होती. दोघे ही गावाहून पुण्यात पळून आले होते. crime
पुण्यात स्पॉटलाईट हॉटेलमध्ये दोघांनी खोली भाड्याने घेतली होती. १३ मे रोजी मध्यरात्री आकाशने मोनिकाचा चादरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याने खोलीतील पंख्याला चादर बांधून गळफास घेतला. दोघे जण मृतावस्थेत सापडल्याची माहिती हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी कुटुंबीयांची चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर असा हा प्रकार उघडकीस आला अधिक तपास हडपसर पोलिसांकडून सुरू आहे.murder
मोनिका आणि आकाश हे दोघे मागील काही वर्षापासून एकमेकांच्या प्रेमात होते. मात्र त्यांच्या कुटुंबियांचा या प्रेमाला विरोध होता. त्यांनी कुटुंबियांना सगळं सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही त्यांचा प्रेमाला विरोध होता. हे सगळं पाहून दोघेही पुण्यात येऊन राहत होता. त्यानंतर १३ मेला मोनिकाचा चादरीने गळा आवळून खून केला आणि स्वत:लाही संपवलं.
पुण्यात यापूर्वीही असे प्रकर अनेकदा घडले आहेत. एकमेकांचा राग करुन किंवा घरातल्यांचा विरोध पाहून थेट जीव घेतले आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्यात अशीच एक घटना समोर आली होती. प्रेमप्रकरणाच्या वादातून प्रेयसीवर तिच्या पार्किंगमध्ये जाऊन तिची हत्या करण्यात आली होती. पुण्यातील औंध परिसरात ही घटना घडली होती. त्यानंतर पोलिसांनी प्रियकराचा शोध घेतला होता. त्यानंतर प्रियकराने थेट आत्महत्या केली होती. त्याचा मृतदेह मुळशीजवळ सापडला होता. त्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. प्रेयसीने बोलणं बंद केलं आणि त्याचा राग मनात धरुन याने हे कृत्य केल्याचं समोर आलं होतं.
नातेवाईकांकडून प्रेमाला विरोध!
प्रेयसीचा खून करून तरुणाची आत्महत्या
RELATED ARTICLES
New Delhi
few clouds
25.3
°
C
25.3
°
25.3
°
79 %
3.2kmh
18 %
Sun
31
°
Mon
31
°
Tue
35
°
Wed
37
°
Thu
37
°