नाशिक : सध्या राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे नदी नाले खळाळून वाहत आहेत. काही भागात शेती पिकांनाही पावसाचा फटका बसला आहे. हवामान विभागाने पुढील ५ दिवस राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला. नाशिक शहर व जिल्ह्यात देखील गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाची रिमझिम सुरूच आहे मात्र अद्यापही धरणसाठ्यात पुरेशा प्रमाणात वाढ झालेली दिसून येत नाही.नाशिक जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम अशा २४ प्रकल्पांमध्ये २४ जूलै अखेर २६.३२ टक्के साठा आहे. पावसाळ्यात बहुतांश धरणे ओव्हरफ्लो झाली होती. पण, काही धरणाचा पाणीसाठा कमीच होता. गेल्या पावसाळ्यापेक्षा जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा १६ टक्के कमीच झाला होता. त्यात आता हा साठा २६.३२ टक्के झाला आहे. जूनपासून पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली असली तरी मुसळधार पाऊस नाही. त्यामुळे काही ठिकाणी तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे. राज्यातही हीच स्थिती आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणा-या गंगापूर धरणाचा साठा ४२.४५ टक्के तर समुहात ३५.०५ टक्के साठा आहे. तर जिल्ह्यातील बहुतांश धरणाची पातळी कमालीची खाली आली आहे. पाच धरणांची पातळी तर शुन्य आहे. तर भावली धरण ९६.५१ टक्के भरले आहे. तर बहुतांश धरणात मात्र दहा ते पंचवीश टक्क्यांच्या आत पाणीसाठा आहे.
दरम्यान, हवामान विभागाने आज पालघर, रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट दिला. तर सिंधुदूर्ग, ठाणे, रत्नागिरी, कोल्हापूर, नाशिक, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला. तसेच हवामान विभागाने उद्या सिंधुदूर्ग, नाशिक, जालना, परभणी, हिंगोली, नागपूर, गोंदीया आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला. तर मराठवाडा आणि खानदेशातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
नाशिक जिल्ह्यातील २४ धरण प्रकल्पांमध्ये
RELATED ARTICLES
New Delhi
haze
24.1
°
C
24.1
°
24.1
°
41 %
2.1kmh
40 %
Fri
26
°
Sat
26
°
Sun
26
°
Mon
25
°
Tue
25
°


