16.1 C
New Delhi
Thursday, December 26, 2024
Homeताज्या बातम्यानिवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेची मोदी सरकार कडून हत्या-गोपाळदादा तिवारी

निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेची मोदी सरकार कडून हत्या-गोपाळदादा तिवारी

पुणे: -तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांचे महत्त्व कमी होऊ नये यासाठी काँग्रेसने सतत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना डावलण्याची भूमिका घेतली.. हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आरोप म्हणजे “असत्य, अतार्किक व वैचारिक दिवाळखोरी दर्शवणारा” आहे, अशी टीका काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी घेतलेल्या “पत्रकार परिषदेत” बोलताना केला.,!
यावेळी जेष्ठ काँग्रेसजन सुभाषशेठ थोरवे, उमेश चाचर, रामचंद्र उर्फ भाऊ शेडगे , भोला वांजळे, धनंजय भिलारे, शंकर शिर्के, राजेश सुतार, गणेश शिंदे इ उपस्थित होते.
स्वातंत्र्योत्तर भारताच्या जडणघडणीत जननायकांची भूमिका निभावणाऱ्या थोर राष्ट्रनेत्यां विषयी .. असत्य, अतार्किक बोलतांना शरम वाटली पाहिजे. केवळ सतत राजकीय असत्य विधाने करून देशांत बहुतांश वेळा जनतेचा कौल मिळालेल्या कांँग्रेस विषयी असत्य विधाने करून प्रतीमा डागाळण्याचा प्रयत्न करू नये..
पुढे बोलताना गोपाळदादा म्हणाले, पंतप्रधान, मुख्यमंत्री अशा घटनात्मक पदांवर असलेल्या व्यक्तींनी अशी विधाने करण्यापूर्वी आपल्या किमान सत्य वास्तवतेप्रती संविधानीक शपथेची बांधिलकी व पदाच्या गरीमेचा व सन्मानाचा विचार करावा..!
ज्या काँग्रेसने मुंबईतुन बॅरिस्टर जयकर यांचा राजीनामा घेऊन डॉ. आंबेडकर यांना लोकसभेत पाठवले व सन्मानाने घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष केले या सत्य वास्तवतेची जाणीव आरोपकर्त्यांनी ठेवावी.
डॉ. आंबेडकर यांना निवडणुकीत पराभव केल्याचा आरोपही काँग्रेसवर केला जातो. मात्र, या आरोपाला कोणताच अर्थ नाही. डॉ आंबेडकर यांनी काँग्रेसमध्ये यावे असा काँग्रेसचा नेहमीच प्रयत्न राहिला. मात्र, डॉ आंबेडकर यांनी. शेड्युल कास्ट फेडरेशन आणि नंतर आरपीआय च्या माध्यमातून स्वतःचे स्वतंत्र राजकिय पक्षाचे अस्तित्व निर्माण केले. त्यामुळे निवडणुकीच्या राजकारणात काँग्रेसने त्यांना पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे तिवारी यांनी स्पष्ट केले. त्या काळात ज्याप्रमाणे काँग्रेसने डॉ आंबेडकर यांना पाठिंबा दिला नाही त्याचप्रमाणे जनसंघाने देखील त्यांना कुठे पाठिंबा दिला वा त्यांना समर्थन देऊन त्यांचा प्रचार केला काय (?) असा संतप्त सवाल ही गोपाळदादा तिवारी यांनी केला.
हिंदू कोड बिलाला होणाऱ्या विरोधामुळे उद्विग्न होऊन डॉ आंबेडकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असला तरी देखील प्रत्यक्षात या बिलावर तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू आणि डॉ आंबेडकर यांच्यामध्ये वाद नव्हता व पं नेहरू हिंदू कोड बिलावर डॅा आंबेडकरांच्या ठाम पाठीशी होते.. हे सर्वश्रुत सत्य असल्याचे देखील तिवारी यांनी निदर्शनास आणून दिले. 
पंजाब- हरियाणा ऊच्च न्यायालयाने, ‘निवडणूक केंद्रातील’ फॅार्म १७ सी व सीसीटीव्ही फुटेज याचिकाकर्त्यांस देण्याचे आदेश निवडणूक आयोगास दिल्यानंतर.. आयोगाने ते देऊकेले असतांना.. २० डिसेंबर रोजी रात्री मोदी सरकारने अशी माहिती देण्यास मज्जाव करणारा एकतर्फी तुघलकी आदेश काढणे म्हणजेच निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेची सरकारने केलेली हत्या असल्याचे त्यांनी सांगितले.
निवडणूक प्रक्रियेतील माहिती व सीसीटीव्ही फुटेज अस्तित्वातील नियमा प्रमाणे देण्यास मज्जाव करणाऱ्या निर्णया विरोधात सर्वोच्च न्यायालयात काँग्रेस आव्हान देत आहे मात्र जनतेत देखील या विषयी माहिती होण्या करीता सदर पत्रकार परीषदेचे आयोजन केल्याचे गोपाळदाद् तिवारी यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की,
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक आयोगाच्या पारदर्शी कारभाराचे कौतुक केले आहे. निवडणूक आयोगाने पारदर्शक आणि प्रभावी काम केल्याचे प्रमाणपत्र त्यांना दिले. 
तर मग पुन्हा पंतप्रधान मोदी यांनी वेगळा आदेश काढून, ‘निवडणूक आयोगास’
माहिती देण्यापासून रोखण्याचे प्रायोजन काय..? असा सवाल ही त्यांनी केला..! फॉर्म १७ सी आणि सीसीटीव्ही चित्र उपलब्ध करून देण्यास मनाई म्हणजे भाजपने निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेची मागील दाराने केलेली हत्याच आहे असा घणाघाती आरोप ही काँग्रेस प्रवक्ते गोपाळदाद् तिवारी यांनी केला…!

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
16.1 ° C
16.1 °
16.1 °
67 %
0kmh
20 %
Thu
19 °
Fri
23 °
Sat
17 °
Sun
21 °
Mon
22 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!