पुणे -” जीवनात यशस्वी आंत्रप्रेन्यूअर होण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित केले पाहिजे. हे ध्येय गाठण्यासाठी कार्यावर फोकस ठेवणे, उत्तम संवाद कौशल्य, वेळेचे नियोजन, संधी शोधणे, वेळेवर डिलिव्हरी देणे आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी असली पाहिजे.” असा सल्ला उद्योजक, लेखक व मार्केटिंग स्ट्रॅटेजिस्ट प्रकाश बंग यांनी दिला.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या रिसर्च, इनोव्हेशन, डिझाइन अॅण्ड आंत्रप्रेन्यूअरशिप (राइड-२४) च्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. हा कार्यक्रम पाच दिवस चालणार आहे.
यावेळी सीडॅकचे कर्नल असित नाथ हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, कुलसचिव गणेश पोकळे, डॉ. संजय कामतेकर, स्कूल ऑफ हेल्थ सायन्सेस अँड टेक्नॉलॉजीचे डीन प्रा.डॉ. नीरज महिंद्रू आणि प्रा.डॉ. दिनेश सेठी हे उपस्थित होते. यावेळी ५ हजार पेक्षा अधिक विद्यार्थी उपस्थित होते.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या मार्गदर्शनात व कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या नेतृत्वात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रकाश बंग म्हणाले,” इंग्रजी ही जागतिक भाषा असली तरी प्रत्येकाने मातृभाषेबरोबरच जास्तीत जास्त भाषांचे ज्ञान अवगत करावे. आपला उत्तम संवाद अनेक संधी घेऊन येतात. आपले विचार आणि दृष्टीकोन सकारात्मक असायला हवा. आंत्रप्रेन्यूअरशीप व व्यवसायामध्ये यशस्वीतेच्या शिखरावर पोहचायचे असेल तर वरील पाच सूत्रांच्या आधारेच ते शक्य आहे.”
कर्नल असित नाथ म्हणाले,” आधुनिक जगात वाढते तंत्रज्ञान लक्षात घेता व्यवसायामध्ये अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. त्यातच आर्टिफिशियल इंटेलिजेंसने दरवाजे ठोठावले आहेत. अशावेळेस त्याचा वापर देशासाठी कसा करता येईल हे पहावे.”
डॉ. आर.एम.चिटणीस म्हणाले,” विद्यार्थ्यांना प्रोफेशनल करियर बनविण्यासाठी राइड कार्यक्रम आहे. यामुळे तुमच्या जीवनात मोठे बदल घडवता येतील. विद्यार्थ्यांनी स्वतःचे स्टार्टअप सुरू करावे. राहुल कराड यांच्या नेतृत्वातील हा कार्यक्रम नक्कीच विद्यार्थ्यांच्या जीवनाला प्रकाश देण्याचे कार्य करेल.”
यावेळी राहुल विश्वनाथ कराड यांचा संदेश वाचून दाखविला.
प्रा.निरज महेन्द्रू यांनी स्वागत पर भाषण केले. डॉ. संजय कामतेकर यांनी राईड बद्दलची विस्तृत माहिती दिली. प्रा.डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले.
पंच सूत्रांच्या आधारे आंत्रप्रेन्यूअरशीपमध्ये यशस्वी होता येते -प्रकाश बंग
एमआयटी डब्ल्यूपीयूमध्ये राइड-२४ चे उद्घाटन; ५० हून अधिक स्टार्टअप, ५ हजारांहून अधिक विद्यार्थी उपस्थित
RELATED ARTICLES
New Delhi
mist
16.1
°
C
16.1
°
16.1
°
77 %
0kmh
0 %
Fri
21
°
Sat
27
°
Sun
29
°
Mon
29
°
Tue
28
°