पुणे : “पुण्याचे अनुकरण देश करतो. पुण्यातील प्रत्येक घर ज्ञानमंदिर झाल्यास पुण्याचे ज्ञाननगरीत होईल. हा हनुमानउडीची जबाबदारी घ्यावी लागणार आहे,” असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी मांडले.
पुणे पुस्तक महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात डॉ. माशेलकर बोलत होते. केंद्रीय सहकार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय पुस्तक न्यासचे अध्यक्ष मिलिंद मराठे, संचालक युवराज मलिक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश गोसावी, महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, कृष्णकुमार गोयल, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक परिषदेचे अध्यक्ष प्रमोद रावत, या वेळी उपस्थित होते.
डॉ. माशेलकर म्हणाले, “पुणे पुस्तक महोत्सवाने वाचनाची संस्कृती वृद्धिंगत केली आहे. नव्या पिढीने पुस्तक हाती घेतले आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे भविष्य सुरक्षित आहे. महोत्सवाला भारत आता बेडूक उडी नाही, तर हनुमान उडी घेत आहे. महोत्सवाच्या पुण्यात पुणे पुस्तक महोत्सवाची वेगळी ओळख निर्माण होत आहे. जागतिक मराठी परिषदेचा अध्यक्ष असताना ज्ञानाधिष्ठित समाजाचा विचार मांडला होता. मराठी टिकण्यासाठी ती ज्ञानभाषा व्हायला हवी. मुंबई पुण्यासह सर्वत्र मराठी शाळा बंद पडत आहेत हे वेदनादायी आहे. मराठी टिकवण्यासाठी मराठी शाळा टिकवण्यासह त्या उत्तम पद्धतीने चालवाव्या लागतील.”
चंद्रकांत पाटील म्हणाले, “यंदाचा महोत्सव गेल्यावर्षीच्या तुलनेत तिप्पट मोठा होण्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात तो चौपट, पाचपट मोठा झाला. ‘शांतता पुणेकर वाचत आहेत’ या धर्तीवर ‘शांतता महाराष्ट्र पुस्तक वाचत आहे’ हा उपक्रम राबवला जाणार आहे. दोन हजार नव्या ग्रंथालयांना मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुर्मिळ ग्रंथांचे टप्प्याटप्प्याने डिजिटायझेशन करण्यात येणार आहे.
पांडे म्हणाले, “पुणेकरांनी नऊ दिवस पुस्तक महोत्सवाला दिलेल्या प्रतिसादामुळे ऊर्जा वाढली आहे. चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ यांच्या सक्रीय पाठिंबा आहे. राज्यभरातून लोक महोत्सवाला येतात. तरुणांचा सहभाग फार मोठा आहे. तरुण वाचत नाहीत हा समज खोटा ठरला आहे. १० लाख लोकांनी महोत्सवाला भेट दिली. ४० कोटी रुपयांची उलाढाल झाली. एक हजारांपेक्षा जास्त लेखक महोत्सवात सहभागी झाले. चार विश्वविक्रम नोंदवले गेले. २५ पेक्षा जास्त सांस्कृतिक कार्यक्रम झाले. १०० पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झाली. १२ लाख पुस्तकांद्वारे चार विश्वविक्रम नोंदवले गेले. पुणे पुस्तक महोत्सव सामूहिक प्रयत्नांचा आविष्कार आहे. आता या उपक्रमाचे चळवळीत रुपांतर झाले पाहिजे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने लेखक वाचक संवाद हा उपक्रम राबवला जाणार आहे.
“वाचन ही सर्वात फायदेशीर सवयींपैकी एक आहे, जी ज्ञान, कल्पनाशक्ती आणि वैयक्तिक वाढीसाठी मदत करते. समज वाढवते, नवीन कल्पनांची ओळख करून देते आणि शब्दसंग्रह आणि अभिव्यक्ती सुधारून संवाद कौशल्ये वाढवते. वाचन मेमरी, फोकस आणि गंभीर विचारसरणी वाढवते आणि दैनंदिन जीवनातून आरामदायी सुटका देखील करते. भिन्न दृष्टीकोन आणि भावनांचा अनुभव देऊन सहानुभूती वाढवते. दररोज काही मिनिटांचे वाचन देखील तुमचा दृष्टीकोन बदलू शकते, ज्यामुळे ते अंतहीन शोध आणि आत्म-सुधारणेचे प्रवेशद्वार बनते. आजच एक पुस्तक घ्या आणि तुमचे जीवन समृद्ध करा! ” – अमित परांजपे, व्यवसाय विकास प्रमुख, परांजपे स्कीम्स कन्स्ट्रक्शन लि