सोलापूर- उजनी धरणात दौंड येथून 90 हजार क्यूसेक्स विसर्गाने पाणी येणार आहे, तसेच वीर धरणा मधून नीरा नदीत 65 हजार क्युसेक्स विसर्गाने पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी चार ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा ते सात पर्यंत नरसिंहपूर येथील निराभिमासंगमापासून भीमा नदीत प्रभावी होणार आहे. त्याचप्रमाणे उजनी धरणात येणाऱ्या विसर्गात सातत्याने वाढ होत असल्यामुळे आज ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता धरणातून भीमा नदीत प्रथम वीस हजार क्युसेक्स विसर्गाने पाणी सोडण्यात येणार आहे, यानंतर धरणात येणारा विसर्ग वाढत असल्यामुळे मध्यरात्री 12 पर्यंत उजनीतून भीमा नदीत किमान 50 ते 70 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार आहे, या सर्व परिस्थितीमुळे नरसिंहपुर पासून भीमा नदीत पाच ऑगस्ट च्या पहाटेपासून १ लाख 25 हजार किंवा त्याहीपेक्षा जास्त विसर्गाने भीमा नदीत पाणी प्रवाही होत असल्यामुळे भीमा नदीला मोठा महापूर येणार आहे. चार ऑगस्ट मध्यरात्रीपासून हळूहळू प्रमाणात नदीचे पाणी वाढणार असल्यामुळे पाच ऑगस्ट च्या सकाळपासून पंढरपूर, मंगळवेढा आदी शहरासहित नदीकाठच्या सर्व गावांना धोक्याचा इशारा देण्यात येत आहे. नागरिकांनी सतर्क रहावे सुरक्षित ठिकाणी जावे असे प्रशासनातर्फे कळविण्यात येत आहे..
भीमा नदीला मोठा महापूर येणार…
पंढरपूर -मंगळवेढा आदी शहरे व नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा….
RELATED ARTICLES
New Delhi
smoke
11.1
°
C
11.1
°
11.1
°
71 %
3.1kmh
0 %
Wed
20
°
Thu
22
°
Fri
23
°
Sat
25
°
Sun
25
°


