सुमारे पाच लाख भाविकांनी पदस्पर्श दर्शन व मुखदर्शन घेतले,
पंढरपूर :- माघ एकादशीचा मुख्य सोहळा दि. 08 फेब्रुवारी रोजी संपन्न झाला. माघी यात्रेत श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनाठी लाखो भाविक पंढरपूरात दाखल झाले होते. दर्शनरांगेतील भाविकांची वाढती गर्दी घेवून त्यांची गैरसोय होऊ नये तसेच दर्शनरांग सुलभ व जलद गतीने चालविण्यासाठी 9 पत्राशेड उभारण्यात आले होते. यात्रा कालावधीत भाविकांसाठी मंदिर समितीकडून आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या. वारकरी भाविकांना चांगल्या व पुरेसा प्रमाणात सोई सुविधा झाल्याने लाखो वारकरी भाविकांची यात्रा सुखरूप व भक्तीमय वातावरणात संपन्न झाली.
भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी, दर्शनरांगेत बॅरीकेटींग करून कायमस्वरूपी 4 पत्राशेड व्यतिरिक्त 5 जादा म्हणजे एकूण 9 पत्राशेडची उभारणी करण्यात आली होती. या दर्शनरांगेत विश्रांती कक्ष, सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा रक्षकांची नियुक्ती, शौचालये, मिनरल वॉटर, लाईव्ह दर्शन, स्पिकरवर भक्तीगीते, चांगली स्वच्छता व्यवस्था, चहा व शाबुदाणा / तांदळाची खिचडी वाटप, अन्नछत्र, अपघात विमा पॉलीसी, रूग्णवाहिका, आरोग्य व्यवस्थेचे स्टॉल व इतर अनुषंगीक सोई सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या.

मंदिर परिसर व दर्शनरांगेत अस्वस्थ झालेल्या सुमारे 25 ते 30 भाविकांना रूग्णवाहिकेद्वारे रूग्णालयात पोहोच केले, आकस्मित मयत झालेल्या 2 भाविकांचे शव गावी पोहोच करण्यासाठी मोफत शववाहिका उपलब्ध करून दिली. याशिवाय, 1 ते 10 फेब्रुवारी पर्यंत सुमारे 2 लाख भाविकांनी पदस्पर्शदर्शन व सुमारे 3 लाख भाविकांनी मुखदर्शन घेतले. स्वच्छतेबाबत विशेष लक्ष देऊन, मंदिर परिसर mandir parisar, दर्शनरांग darshanrang, चंद्रभागा वाळवंट येथून दैनंदिन 15 ते 20 टन कचरा उचलण्यात आला आहे. यासाठी श्री.ज्ञानेश्वर महाराज स्वयंसेवा कार्यकारी मंडळ (स्वकाम सेवा) आळंदी, विश्व सामाजीक सेवा संस्था आळंदी व श्री.संत ज्ञानेश्वर सेवा मंडळ आळंदी यांचेकडील सुमारे 300 स्वयंसेवकांनी 2 शिफ्टमध्ये सेवा दिली. तसेच पत्राशेड येथील अन्नछत्रासाठी संत मिराजी महाराज पुरूष व महिला सेवेधारी मंडळ, अकोला या संस्थेच्या स्वयंसेवकांनी सेवा दिली.
महिला भाविकांसाठी चंद्रभागा वाळवंट chandragabha येथे 8 चेंजिंग रूम व 3 हिरकणी कक्ष उभारण्यात आले आहेत. कायमस्वरूपी व तात्पुरत्या स्वरूपात 128 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. श्री. संत ज्ञानेश्वर दर्शनमंडप येथे चौकशी कक्ष उभारून मराठी, इंग्रजी, हिंदी, कन्नड व तेलगू भाषा अवगत असलेले कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत.
याशिवाय, श्री. संत गजानन महाराज मठ अकोला यांचेकडील सुमारे 200 स्वयंसेवकांनी दर्शनरांगेत चहा व खिचडीची वाटपाची सेवा दिली. श्री संत तुकाराम भवन येथील अन्नछत्रात दैनंदिन 5000 ते 6000 भाविक व स्वयंसेवकांनी प्रसादाचा लाभ घेतला. त्यासाठी गिताई सेवाभावी संस्था औसा यांच्या 60 स्वयंसेवकांनी सेवा केली. देणगी जमा करण्यासाठी जादा 20 स्टॉल उभारण्यात आले होते व देणगी संकलनाची सेवा श्री.विठ्ठल सेवा मंडळ, पुणे यांनी दिली. भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने पत्राशेड येथे तालुका वैद्यकीय अधिकारी यांचे मार्फत, दर्शनमंडप येथे उपजिल्हा रूग्णालय व माळवदावर वैष्णव चॅरीटेबल ट्रस्ट, मुंबई यांनी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिली. चंद्रभागा नदीपात्रात भाविकांच्या सुरक्षततेच्या दृष्टीने व आपत्कालिन व्यवस्थेकामी 40 सुरक्षा रक्षक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांना पुरविले होते.
मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी माघ यात्रेत वारकरी भाविकांना पुरेसा प्रमाणात सोई सुविधा उपलब्ध करून देणेबाबत चांगले नियोजन केले तसेच अधिनस्त कर्मचारी व स्वयंसेवकांनी देखील कर्तव्य चांगले पध्दतीने बजावल्याने लाखो वारकरी भाविकांची यात्रा सुखरूप व भक्तीमय वातावरणात संपन्न झाली.