32 C
New Delhi
Monday, July 7, 2025
Homeताज्या बातम्याराष्ट्रीय वैज्ञानिक गोलमेज परिषदेचे आयोजन

राष्ट्रीय वैज्ञानिक गोलमेज परिषदेचे आयोजन

एमआयटी डब्ल्यूपीयू: देश विदेशातील १३० शास्त्रज्ञांचा सहभाग

पुणे- एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी तर्फे देशात प्रथमच विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित भारतीय शास्त्रज्ञांची तीन दिवसीय ‘पहिली राष्ट्रीय वैज्ञानिक गोलमेज परिषद’(एनएसआरटीसी) विकसीत भारत २०४७ आयोजित करण्यात येत आहे. शुक्रवार, दि. १९ ते रविवार, दि. २१ जुलै या कालावधित ही परिषद एमआयटी डब्ल्यूपीयूमध्ये संपन्न होणार आहे. अशी माहिती ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, पद्मभूषण डॉ. विजय भटकर, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड आणि एनएसआरटीसी चे राष्ट्रीय संयोजक व एमआयटी डब्ल्यूपीयूचे प्र-कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या परिषदेचे उद्घाटन शुक्रवार, १९ जुलै रोजी एमआयटी डब्ल्यूपीयूमध्ये सायं ४ ते ६ या कालावधीत होणार आहे. यावेळी राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय डॉ. जितेंद्र सिंग हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. डीएसआयआरचे महासंचालक व सचिव डॉ. सौ. एन. कलई सेल्वी , पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, पद्मभूषण डॉ. विजय भटकर, माजी महासंचालक डॉ. शेखर मांडे, मुंबई येथील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे माजी कुलगुरू डॉ. गणपती यादव आणि मद्रास आयआयटीचे प्रा.टी. प्रदीप हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
तसेच समारोप समारंभ रविवार, २१ जुलै रोजी सायं. ४ ते ६ या कालावधीत हॉटेल टीप टॉप मध्ये संपन्न होईल.
परिषदेच्या अध्यक्षस्थानी एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे असतील. ही परिषद एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्यकारी अध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून साकार होत आहे.
या परिषदेचा मुख्य उद्देश्य भौतिक विज्ञान, जीव विज्ञान आणि अभियांत्रिकी व तंत्रज्ञानाच्या सर्व पैलूंवरील अनुभव आणि संशोधनाच्या परिणामांची देवाण घेवाण व आदान प्रदान करण्यासाठी अग्रगण्य शैक्षणिक शास्त्रज्ञ, संशोधक आणि संशोधन विद्वानांना एकत्र आणणे हा आहे.
या परिषदेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे सहभागी शास्त्रज्ञ नवीन कल्पना आणि नवीन दिशा मांडतील. यामुळे शिक्षणतज्ज्ञ आणि संशोधकांना विशेषतः नवोदित तरुण पिढीला, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सर्व उद्योन्मुख क्षेत्रांमध्ये मूलभूत संशोधनाला आधार मिळेल. तसेच हे संशोधन पुढे नेण्यासाठी प्रेरणा मिळेल. या परिषदेत आंतरविद्याशाखीय तसेच आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या नवीन मार्गावर चर्चा केली जाणार आहे. नवीन शोध, विकासाचे नवीन नमुने आणि वितरणाचे नवे मार्ग आणि विज्ञानाला सशक्त बनविण्याचा मार्ग प्रेरित करतील.
गोलमेज परिषद २०२४ मध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे एक समान, शाश्वत आणि मानवकेंद्रित यासाठी विकसित भारत अ‍ॅट १०० तयार करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची साधने विकसित करून नवीन मार्ग शोधणे आहेे, जो उर्वरित जगासाठी एक आदर्श असेल.या परिषदेत आर्टीफिशियल इंटेलिजेन्ट (कृत्रिम बुद्धिमत्ता), अ‍ॅडव्हॉन्स मटेरियरिल्स अ‍ॅण्ड प्रोसेसिंग, अ‍ॅग्री टेक (कृषी तंत्रज्ञान), बायोटेक्नॉलॉजी (जैव तंत्रज्ञान), क्लाइमेट चेज (वातावरणातील बदल), डिजिटल ट्रान्सफॉर्ममेशन, हेल्थ केअर (आरोग्याची काळजी) आणि सायन्स, सायन्टीफिक टेम्पर अ‍ॅण्ड स्पिरिच्यूलिटी या विषयांवर परिचर्चा होणार आहे.


तीन दिवस चालणार्‍या या गोलमेज परिषदेत पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, डीसीएसआयआरचे सचिव व सीएसआयआर महासंचालक डॉ. कलाई सेल्वी, पद्मभूषण डॉ. विजय भटकर, डॉ. गणपती यादव, डॉ. शेखर मांडे, अमेरिकेतील शास्त्रज्ञ डॉ. अशोक जोशी, पद्मश्री डॉ. थल्लापाई प्रदिप, प्रा.डॉ. एम.एस. रामचंद्रा राव,  डॉ. रिचर्ड लोबो, प्रा.डॉ. अजित कुलकर्णी, डॉ. उमेश वाघमोरे, डॉ. दिपंकर दास शर्मा, डॉ. दिनेश आस्वाल, डॉ. टाटा ए. राव, डॉ. भूषण पटवर्धन, प्रा. अनिल सहस्त्रबुद्धे, डॉ. निरज खरे, डॉ. के. सामी रेड्डी,  डॉ. अतुल वर्मा, यूएसए येथील डॉ.अशोक खांडकर, डॉ. सुमित्रे, इस्रोचे वैज्ञानिक डॉ. इलांगवन, आयआयसी बंगलोर चे प्रो.कृपानिधी, प्रो. अनिक कुमार, आयसरचे डायरेक्टर प्रो. अशोक गांगुली, डॉ. रजत मोना, प्रा.दास गुप्ता, डॉ. नाग हनुमैया, समीरचे संचालक डॉ. हणमंतराव, सिडन विद्यापीठाचे प्रा. डॉ. कौस्तुभ दलाल, परड्यू युनिव्हर्सिटी प्रा.सचिन पोळ, डीएसआयआरच्या प्रमुख  डॉ. सुजता चकलानोबिस यांच्या सहित संपूर्ण भारतातून जवळपास १३० वेगवेगळ्या विषयातील शास्त्रज्ञ उपस्थिती दर्शविणार आहेत.  
विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या या परिषदेच्या निमित्ताने १३० शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या विषयांवर केलेल्या संशोधनाच्या गोषवाराचे (अ‍ॅबस्ट्रॅक बुक) पुस्तक प्रकाशन करण्यात येईल.
ही गोलमेज परिषद  युटूब, फेसबूक, इन्स्टाग्राम वर थेट प्रसारित केले जाईल.
आयोजित पत्रकार परिषदेत एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ.आर.एम.चिटणीस, अमेरिकेतील शास्त्रज्ञ डॉ. अशोक जोशी, डब्ल्यूपीयूचे सीएओ डॉ. संजय कामतेकर, डॉ. एम.एस. रामचंद्रा राव, डॉ. भारत काळे आणि डॉ.चवली मूर्ती उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
32 ° C
32 °
32 °
70 %
2.2kmh
99 %
Mon
32 °
Tue
38 °
Wed
35 °
Thu
35 °
Fri
35 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!