पंढरपूर विठ्ठल-रूक्मिणी मंदिर पुरातन असल्याने याचे संवर्धन व पुरातन लुक देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.मंदिरातील हनुमान मंदिर दरवाजा परिसरात फरशा काढण्यासाठी कामगार खोदकाम करीत असताना तळघर दिसून आले.यामुळे काम थांबविण्यात आले असून तळघर किती लांबी रूंदीचे आहे.त्यात कोणत्या वस्तू आहेत याची पाहणी करण्यासाठी पुरातन विभागाचे पथक सायंकाळी येणार आहेत.तळघरा बाबत नागरिकात उत्सुकता लागली होती.
विठल-रूक्मिणी मंदिर प्राचिन असल्याने याचे संवर्धन व पुरातन लुक देण्यासाठी पुरातन विभागाने आराखडा तयार केला आहे.या कामासाठी शासनाने १५० कोटी रूपयाचा निधी दिला आहे.यातून मंदिरात कामास सुरवात करण्यात आली आहे.सुरवातील विठल-रूक्मिणी गाभार्यातील ग‘ेनाईट व चांदी काढून पुरातन लुक देण्यात आले आहे.कामासाठी विठलाचे पददर्शन बंद करून मुख दर्शन पहाटे ५ ते सकाळी ११ वाजेपर्यत ठेवण्यात आले आहे.गाभार्यातील काम पूर्ण झाले असून २ जून पासून विठलाचे पदर्शन खुले करण्यात येणार आहे.तळघर पुरातन असल्याने याची पाहणी करण्यासाठी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी पुरातन विभागाशी संपर्क केला.पुरातन चिभागाचे अधिकारी यांनी पाहणी केली.
तळघरात मूर्ती व काही नाणी सापडली
विठ्ठल मंदिरातील हनुमान दरवाजा जवळ खोदकाम करत असताना तळघर सापडले यामुळे याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती पुरातन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी पाच वाजता मंदिरात येऊन तळघराची पाहणी केली. तेव्हा तळघर असून तळघरात तीन फुटाच्या सहा ते सात देवाच्या मुर्त्या सापडल्या आहेत. विठ्ठल मंदिराजवळील हनुमान गेटजवळ तळघराचा दरवाजा सापडला. त्यात प्रवेश केला असता काही बांगड्याचे तुकडे, तसेच काही नाणी सापडल्याचे पुरातत्व विभागाने सांगितले आहे. पादुका, नाणी ही आढळून आली आहेत. देवाच्या मुर्त्या पंधराव्या शतकातील असल्याचा अंदाज प्रातन विभागाचे संचालक विलास वाहने यांनी व्यक्त केला आहे. याचा तपास करून अहवाल शासनाला सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
खालील लिंक ओपन करा