पुणे- मे महिन्याचा आज पहिला दिवस आणि पहिल्याच दिवशी व्यावसायिकांसाठी दिलादायक बातमी आहे. ती म्हणजे घरातील वापरण्यात येणाऱ्या सिलेंडरच्या किंमतीत घट करण्यात आली आहे. तेल विपणन कंपन्यांनी 1 मे पासून तत्काळ प्रभावीपणे व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती 19 रूपयांनी कमी केल्या आहेत. यासह, 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किरकोळ विक्री किंमत ₹ 1,745.50 इतकी झाली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, आजपासून देशातील विविध शहरांमध्ये एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 19 रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे. मात्र, या कपातीचा लाभ केवळ 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरवरच मिळणार आहे. यावेळीही घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.मागील महिन्यातही एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली होती. गेल्या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून म्हणजेच १ एप्रिलपासून १९ किलो एलपीजी सिलिंडरची किंमत ३५ रुपयांनी कमी करण्यात आली होती. त्याआधी सलग तीन महिने व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत वाढ होताना दिसत होती.
व्यावसायिकांसाठी दिलासादायक बातमी !
सिलेंडरच्या किंमतीत घट
RELATED ARTICLES
New Delhi
haze
14.1
°
C
14.1
°
14.1
°
54 %
2.6kmh
0 %
Wed
16
°
Thu
22
°
Fri
23
°
Sat
24
°
Sun
24
°


