22.1 C
New Delhi
Saturday, March 15, 2025
Homeताज्या बातम्याश्री रसिकलाल एम धारिवाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीला ३ वर्षांसाठी मानांकन प्राप्त

श्री रसिकलाल एम धारिवाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीला ३ वर्षांसाठी मानांकन प्राप्त

चिंचवड- श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री रसिकलाल एम धारिवाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, चिंचवड मधील संगणक अभियांत्रिकी व यांत्रिक अभियांत्रिकी या दोन पदविका अभ्यासक्रमांना नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रिडीटेशन (एन.बी.ए) या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेकडून ३ वर्षांसाठी मानांकन प्राप्त झाले.नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रिडीटेशन (एन.बी.ए) या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेच्या त्रिसदस्यीय समितीने संस्थेस दि.17 ते 19 जानेवारी 2025 या कालावधीत भेट देऊन पाहणी केली होती. शैक्षणिक गुणवत्ता, अध्यापन-अध्ययन प्रक्रिया, विद्यार्थ्यांची शैक्षणिक आकलनातील प्रगती, निकालातील सातत्य, महाविद्यालयातील पायाभूत सुविधा, करियर गाईडन्स, प्लेसमेंट, पालक आणि माजी विद्यार्थ्यांचे संस्थेबद्दलचे मत अशा विविध मुद्यांवर समितीने पाहणी केली होती.तंत्रनिकेतनमधील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी गुणवत्तापूर्ण, सामाजिक जाण असलेले कुशल अभियंते घडविण्यासाठी आजवर घेतलेल्या कष्टाची ही पोच पावती आहे असे मनोगत प्राचार्य श्री अनिल थिटे यांनी व्यक्त केले.एन बी ए चे मानांकन तंत्रनिकेतनला मिळवण्यासाठी श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री प्रकाशजी धारिवाल, कार्याध्यक्ष श्री शांतीलालजी लुंकड , ऑनरारी जनरल सेक्रेटरी श्री. राजेंद्रकुमारजी मुथा ,खजिनदार प्रकाशजी चोपडा, विकास अधिकारी खिल्लारी सर प्राचार्य अनिल थिटे यांनी शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांना मार्गदर्शन केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
22.1 ° C
22.1 °
22.1 °
49 %
3.6kmh
40 %
Fri
25 °
Sat
35 °
Sun
33 °
Mon
33 °
Tue
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!