25.7 C
New Delhi
Monday, August 25, 2025
Homeताज्या बातम्यासरकार कसे स्थापन करणार? 

सरकार कसे स्थापन करणार? 

पंतप्रधान मोदींनी दिले स्पष्ट संकेत

नवी दिल्ली- ’आम्ही पूर्ण मेहनतीने काम केलं आहे. २०२४ मध्ये गॅरंटी घेऊन लोकांमध्ये मतदानासाठी देशातील कोनाकोपऱ्यात गेलो होतो. आज तिसऱ्यांदा लोकांचा आशिर्वाद मिळाला आहे, मी त्यासाठी जनतेसमोर नतमस्तक आहे. सहकाऱ्यांनो, आजची ही वेळ माझ्यासाठी भावुक क्षण आहे. माझी आई गेल्यानंतर ही माझी पहिली निवडणूक होती, देशातील कोटी मातांनी मला आईची कमी जाणवू दिली नाही. मी जेव्हा लोकांमध्ये गेलो, तेव्हा मला आशिर्वाद दिला, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली भावना व्यक्त केली. येणाऱ्या काळामध्ये आम्ही आणखी चांगले काम करू, राष्ट्रासाठी आम्ही पुढे गेले पाहिजे अशी वेळ आहे. विकसित राष्ट्रासाठी चांगले निर्णय घेण्याची वेळ आली आहे, एनडीएला जनतेने कौल दिला आहे, हे नातं कायम टिकवणार आहे, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी सरकार स्थापन करणार असे संकेत दिले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये भाजपला बहुमताने हुलकावणी दिली आहे. त्यानंतर आता सरकार कसे स्थापन करणार अशी चर्चा रंगली आहे. त्यानंतर दिल्लीत भाजपच्या मुख्यालयामध्ये पंतप्रधान मोदी यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि एनडीए सरकार स्थापन करणार असे स्पष्ट संकेत दिले आहे.
’आजचा हा विजय जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा विजय आहे. हे भारताच्या संविधानावर निष्ठेचा विजय आहे. हा विकसित भारताचा विजय आहे. सब की साथ सब का विकासाचा विजय आहे. १४० कोटी भारतीय लोकांचा विजय आहे. देशाच्या निवडणूक आयोगाचा मी आभारी आहे. जगातली सर्वात मोठी निवडणूक आयोगाने व्यवस्थिती हाताळली आहे. प्रचंड उन्हामध्ये लोकांनी मतदान केलं. आपल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी परिचय दिला. भारताची निवडणूक प्रक्रिया आणि व्यवस्थेवर भारतीयांना गर्व आहे. या सारखं कुठेही उदाहरण नाही. यावेळी भारतात ज्या लोकांनी मतदान केले, ते एखाद्या लोकशाही मानणाऱ्या लोकांच्या पेक्षा जास्त आहे. जम्मू काश्मीरमध्ये निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांनी मतदान केले असून जगातील लोकांसमोर आदर्श घालून दिला आहे. त्या लोकांनी आदरपूर्वक नमन करतो. सर्व उमेदवारांचे मी अभिनदन करतो. सगळ्यांची सहभागामुळे हा विजय शक्य नव्हता. प्रत्येक कार्यकर्त्याचा मी आभारी आहे, अशी भावना मोदींनी व्यक्त केली.
’या निवडणुकीमध्ये या जनादेशाचे अनेक पैलू आहे. १९६२ नंतर कोणतं तरी सरकार आपला कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर परत आलं आहे. राज्यामध्ये जिथे विधानसभा निवडणूक झाली तिथे एनडीएला भक्कम विजय मिळाला आहे. अरुणाचल प्रदेश असेल ओडीसा असेल किंवा सिक्कीम असेल तिथे भाजपचं राज्य आलं आहे. तिथे काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. त्यांना डिपॉझिट वाचवणं सुद्धा कमी झालं आहे. भाजप ओडिसामध्ये सरकार स्थापन करणार आहे. सोबत लोकसभा निवडणुकीतही ओडिशाने चांगले काम केले आहे. हे पहिल्यांदाच घडलं आहे. हे पहिल्यांदाच घडलं जगन्नाथच्या धर्तीमध्ये भाजप सरकार स्थापन करत आहे. केरळमध्ये लोकांनी भरभरून मतदान केले आहे. तेलंगणामध्ये लोकांनी मतदान केले आहे, तिथे आपली संख्या डब्बल झाली आहे. गुजरात,छत्तीसगड, उत्तराखंड अनेक राज्यामध्ये आमच्या पक्षाने क्लिन स्वीप केले आहे. या राज्यामध्ये आंध्रप्रदेश, सिक्कीम आणि ओडिशांच्या लोकांचे मी आभार मानतो. केंद्र सरकार तुमच्या विकासासाठी कोणतीही कसर सोडणार नाही. आंध्रामध्ये चंद्रबाबू नायडू यांच्या नेतृत्वामध्ये चांगले काम केले आहे. नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीएने चांगले काम केले आहे’ असेही मोदी म्हणाले.
आम्ही पूर्ण मेहनतीने काम केले आहे. २०२४ मध्ये गॅरंटी घेऊन लोकांमध्ये मतदानासाठी देशातील कोनाकोपऱ्यात गेलो होतो. आज तिसऱ्यांदा लोकांचा आशिर्वाद मिळाला आहे, मी त्यासाठी जनतेसमोर नतमस्तक आहे. सहकाऱ्यांनो, आजची ही वेळ माझ्यासाठी भावुक क्षण आहे. माझी आई गेल्यानंतर ही माझी पहिली निवडणूक होती, देशातील कोटी मातांना मला आईची कमी जाणवू दिली नाही. मी जेव्हा लोकांमध्ये गेलो, तेव्हा मला आशिर्वाद दिला. हे मी आकड्यांमध्ये पाहू शकत नाही. महिलांनी मोठ्या संख्येनं मतदान केलं आणि रेकॉर्ड केलं. देशातील कोट्यवधी मातांनी मला आशिर्वाद दिला. देशाने खूप काही सहन हे आम्हाला काही करण्याची शक्ती निर्माण करते, आम्ही जगातील कल्याणकाही योजना चालवली आणि पुढेही आपल्याला राष्ट्रासाठी असंच काम करायचे आहे, असेही मोदी म्हणाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
25.7 ° C
25.7 °
25.7 °
87 %
4kmh
100 %
Mon
30 °
Tue
34 °
Wed
35 °
Thu
36 °
Fri
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!