26.5 C
New Delhi
Thursday, October 9, 2025
Homeताज्या बातम्याहोय मी भटकती आत्मा, माझा आत्मा स्वतःसाठी नाही, जनतेसाठी! 

होय मी भटकती आत्मा, माझा आत्मा स्वतःसाठी नाही, जनतेसाठी! 

शरद पवारांचे नरेंद्र मोदींना सडेतोड उत्तर

शिरुर- माझा आत्मा हा अस्वस्थ आहे, पण स्वतःसाठी नाही. तर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, महागाईतून जनतेची सुटका करण्यासाठी माझा अस्वस्थ आहे. यासाठी मी शंभरवेळा अस्वस्थता दाखवेन. असे सडेतोड प्रत्त्युत्तर जेष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद मोदी यांना दिला.शिरुर मतदार संघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ ओतूर मध्ये जेष्ठ नेते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार अशोक पवार, माजी आमदार ऍड. राम कांडगे, दिलीप ढमढेरे, शिवसेना उपनेते बबनराव थोरात माजी आमदार बाळासाहेब दांगट, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश भोर उपजिल्हाप्रमुख संभाजी तांबे,  बाबा परदेशी, अनंतराव चौगुले, सुनिल मेहेर, बाजीराव ढोले, शरद चोधरी, बाळासाहेब बाणखेले, अल्लूभाई ईनामदार,अनिल तांबे, दिपक औटी, बाबू पाटे, सुरेखा वेठेकर, राजश्री बोरकर, किशोर दांगट, शरद लेंढे,सुरज वाजगे,अंकुश आमले,मोहित ढमाले आदी उपस्थित होते.

शरद पवार पुढे म्हणाले की, आमच्यावरचे संस्कार यशवंतराव चव्हाणांचे आहेत, त्यात आम्ही तडजोड करणार नाही. जे माझ्या बोटाला धरून राजकारणात आलेले, आता माझ्या बद्दल काय बोलतात. एक आत्मा भटकत आहे असं तुम्ही म्हणाले, त्या आत्म्यापासून सुटका व्हायला हवी, अस मोदी म्हणाल्याच सांगत पवारांनी मोदींवर निशाणा साधला.

पवार म्हणाले की, पंतप्रधान काल म्हणाले ईडी चा मी एक टक्का ही वापर करत नाही. जे चांगलं काम करतात त्यांचा विरुद्ध सत्तेचा गैरवापर केला जातो. आता तुम्ही एक टक्का म्हणा की आणखी काय म्हणा. तुम्ही हुकूमशाहीच्या दिशेने जाताय. जनतेला अडचणीतून दूर करण्यासाठी सत्तेचा वापर करायचा असतो, इथं अडचणीत आणण्यासाठी सत्तेचा गैरवापर केला जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
26.5 ° C
26.5 °
26.5 °
61 %
2.1kmh
0 %
Thu
30 °
Fri
32 °
Sat
33 °
Sun
33 °
Mon
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!