पिंपरी : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार अमित गोरखे यांची तालिका सभापतीपदी निवड करण्यात आली आहे. ही नियुक्ती विधानपरिषद सभापती मा. राम शिंदे यांनी सभागृहात जाहीर केली.नुकतेच विधानपरिषदेवर निवडून आलेल्या अमित गोरखे यांच्यासाठी ही निवड विशेष मानाची बाब ठरली आहे. सभागृहाच्या कार्यवाहीत संयम, नियमबद्धता आणि शिस्तीचे प्रतीक असलेल्या तालिका सभापतीपदावर गोरखे यांच्यासारख्या अभ्यासू आणि प्रभावी नेतृत्वाची निवड झाल्यामुळे भाजपच्या युवा नेतृत्वाला नवे बळ मिळाल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. या निवडीनंतर गोरखे म्हणाले, “मा. राम शिंदे यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास माझ्यासाठी सन्मानास्पद आहे. हे केवळ पद नसून, कार्यक्षम सभागृह संचालनाची जबाबदारी आहे. नवनिर्वाचित आमदार म्हणून माझ्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीलाच मिळालेली ही संधी मी पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडेन.”तसेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानत, “त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मी या स्थानावर उभा आहे,” असे सांगितले.अमित गोरखे यांची ठाम वक्तृत्वशैली, विषयावरील सखोल अभ्यास आणि जनतेशी असलेली थेट नाळ यामुळेच त्यांची निवड झाली असून, त्यांच्या नेमणुकीने विधानपरिषदेत एक नवा ऊर्जा प्रवाह निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
अमित गोरखे तालिका सभापतीपदी
RELATED ARTICLES
New Delhi
scattered clouds
28.6
°
C
28.6
°
28.6
°
77 %
3.3kmh
37 %
Tue
29
°
Wed
38
°
Thu
40
°
Fri
38
°
Sat
36
°