12.1 C
New Delhi
Tuesday, January 13, 2026
Homeताज्या बातम्याबांधकाम सळयांनी कंटेनरचा केबिन भेदला

बांधकाम सळयांनी कंटेनरचा केबिन भेदला

चांदणी चौकातील भीषण अपघातात एक ठार

pune accident – पुणे, – पुणे शहरातील चांदणी चौकामध्ये गुरुवारी एक विचित्र व भीषण अपघात घडला आहे. बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या लोखंडी सळया घेऊन जाणाऱ्या कंटेनरने नियंत्रण गमावल्याने झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्याची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे समजते. या अपघाताचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ही घटना चांदणी चौकातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर घडली. कंटेनर अचानक ब्रेक दाबल्याने त्यामधील जड लोखंडी सळया थेट ड्रायव्हरच्या केबिनमध्ये घुसल्या. त्यामुळे चालक आणि एक सहकारी केबिनमध्ये अडकून गेले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी मदतीचा प्रयत्न केला; मात्र लोखंडी सळ्यांमुळे रेस्क्यू अत्यंत कठीण झाले.

पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून युद्धपातळीवर अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात आले. हा अपघात बांधकाम साहित्याची वाहतूक किती धोकादायक ठरू शकते याचे गंभीर उदाहरण ठरत आहे.

या घटनेमुळे चांदणी चौक परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

News Title: Tragic Pune Accident: Iron Rods Pierce Cabin in Chandani Chowk Container Crash; One Dead, One Critical

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
12.1 ° C
12.1 °
12.1 °
62 %
1.5kmh
0 %
Tue
14 °
Wed
20 °
Thu
22 °
Fri
23 °
Sat
24 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!