मुंबई, – राज्यातील रस्त्यावर राहणाऱ्या, एकल, अनाथ व दुर्लक्षित बालकांसाठी पुनर्वसनाची आणि नवजीवनाची संधी निर्माण करणारी ‘फिरते पथक योजना’ संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली.
ही योजना बालहक्कांच्या संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक असून, रस्त्यावर राहणाऱ्या मुलांना शिक्षण, आरोग्यसेवा, पोषण, समुपदेशन आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आवश्यक सहकार्य देण्यात येणार आहे.
📌 ३१ शहरांमध्ये फिरती पथके कार्यरत
- राज्यातील २९ महापालिकांमध्ये प्रत्येकी एक फिरते पथक कार्यरत राहील
- मुंबई महानगरपालिकेसाठी पूर्व व पश्चिम उपनगरांसाठी स्वतंत्र दोन पथके
- एकूण ३१ फिरती पथके कार्यान्वित करण्यात येणार
- भविष्यात योजनेचा व्याप्तीवाढीचा विचार
🎯 योजनेचे मुख्य उद्दिष्ट:
- रस्त्यावर राहणाऱ्या मुलांचे शैक्षणिक, सामाजिक व वैद्यकीय पुनर्वसन
- मुलांना वयानुसार अंगणवाडीत किंवा शाळेत प्रवेश
- आरोग्य तपासणी, लसीकरण, पोषण आहार, व्यसनमुक्ती व स्वच्छतेवर भर
- मुलांच्या कलागुणांचा विकास, समुपदेशन, सर्जनशील उपक्रमांत सहभाग
- दरमहा किमान २०% मुलांना शाळेत प्रवेश मिळवून देणे बंधनकारक
- त्रैमासिक निधी वितरित व नियमित आढावा घेण्याची व्यवस्था
🚌 बाल स्नेही बसद्वारे सेवा
या योजनेअंतर्गत निवडलेल्या स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने ‘बाल स्नेही बस’ किंवा व्हॅनद्वारे सेवा पुरवली जाणार आहे. या बसमध्ये:
- समुपदेशक, शिक्षक, महिला कर्मचारी व वाहनचालक अशी चार जणांची टीम
- बसमध्ये GPS ट्रॅकिंग व CCTV कॅमेरे
- मुलांचे सामाजिक अन्वेषण अहवाल तयार करून वैयक्तिक पुनर्वसन आराखडे
- मिशन वात्सल्य अंतर्गत योजनेची सुरुवात आधीच सहा जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर करण्यात आलेली होती
🧒🏻 एक सकारात्मक पाऊल:
ही योजना केवळ बालकांच्या पुनर्वसनापुरती मर्यादित नसून, त्यांच्या मूलभूत हक्कांचा सन्मान आणि सशक्त नागरिक म्हणून विकासासाठीचे एक व्यापक धोरणात्मक पाऊल आहे.