पिंपरी – स्वच्छता ही केवळ जबाबदारी नव्हे, तर सवय बनली पाहिजे – हे सिद्ध केले आहे. (EcoFriendlyHote) मोरवाडीतील ‘कीज हॉटेल’ या आस्थापनाने. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘शून्य कचरा’ अभियानाला प्रतिसाद देत, हॉटेलने प्लास्टिकविना कार्यपद्धती, ओल्या-सुक्या कचऱ्याचे व्यवस्थापन आणि होम कंपोस्टिंगचा प्रभावी अवलंब केला आहे.
याच अनुशंगाने महापालिकेच्या ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्यावतीने कीज हॉटेलचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. स्वच्छता, पर्यावरण आणि जबाबदारी यांचा उत्कृष्ट समन्वय साधणाऱ्या हॉटेलचे हे कौतुक केवळ त्यांच्या सन्मानापुरते मर्यादित नसून, इतर आस्थापनांसाठी आदर्श ठरणारे आहे.

💡 झिरो वेस्टची प्रॅक्टिकल अंमलबजावणी
‘कीज हॉटेल’मध्ये निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर जागेवरच प्रक्रिया करून कंपोस्ट खत तयार केले जाते, तर सुक्या कचऱ्याचे योग्य वर्गीकरण आणि रिसायकलिंग केले जाते. कोणत्याही प्रकारचा प्लास्टिक वापर(KachraMuktaShahar) न करता पर्यावरणपूरक कामकाज चालवणारे हे हॉटेल झिरो वेस्ट तत्त्वांची अमलबजावणी करणारे शहरातील पहिले हॉटेल ठरले आहे.
👏 महापालिकेचे अधिकारीही उत्साही
सत्कार समारंभात अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उप आयुक्त (आरोग्य) सचिन पवार, ‘अ’ क्षेत्रीय अधिकारी शीतल वाकडे, सहा. आरोग्य अधिकारी राजू साबळे, मुख्य आरोग्य निरीक्षक दत्तात्रय गणगे आणि आरोग्य निरीक्षक स्नेहा चांदणे यांनी उपस्थित राहून प्रशस्तीपत्र प्रदान केले. कीज हॉटेलचे वरिष्ठ अधिकारी आणि महापालिकेचे कर्मचारीही यावेळी उपस्थित होते.
🗣️ :
“पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘शून्य कचरा’ मोहिमेला नागरिकांबरोबरच उद्योगांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, हीच अपेक्षा.“
— विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिं.चिं. महापालिका
“आरोग्य विभागाने राबविलेला ‘झिरो वेस्ट’ जनजागृती उपक्रम हा प्रशंसनीय असून, ‘कीज हॉटेल’चा अनुभव इतर आस्थापनांसाठी मार्गदर्शक ठरेल.“
— सचिन पवार, उप आयुक्त, आरोग्य विभाग
✅ उल्लेखनीय बाबी :
- प्लास्टिकविरहित हॉटेल
- ओल्या कचऱावर जागेवर प्रक्रिया
- ‘शून्य कचरा’ संकल्पनेचे यशस्वी उदाहरण
- स्वच्छ भारत आणि पर्यावरणपूरक शहरासाठी प्रेरणा