‘सिल्व्हर जुबिली ग्रुप’च्या सातत्यपूर्ण प्रगतीतील आणखी एक उल्लेखनीय कामगिरी
पुणे , : पुण्यातील ऑटोमोबाईल क्षेत्रात १९३५ पासून विश्वासार्ह नाव असलेल्या सिल्व्हर जुबिली ग्रुपअंतर्गत कार्यरत सिल्व्हर मोटर्स – निसान या नव्या अत्याधुनिक शोरूमचे पुणे कॅम्प येथे भव्य उद्घाटन पार पडले. या शोरूमचे उद्घाटन निसान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ वत्स यांच्या हस्ते झाले. यावेळी निसान मोटर इंडियाचे डायरेक्टर अभिषेक अरोरा,विवेक पल्लिवाल, राकेश नेगी, मृन्मय गोगोई तसेच निसानची टीम उपस्थित होती.
भारतामध्ये निसानची उपस्थिती १९६५ पासून असून, भारतीय सैन्याने विश्वास ठेवत निसान पॅट्रोल ६० (जोंगा) वाहनाची निवड केली होती. विविध युद्ध मोहिमांमध्ये हे विश्वासार्ह वाहन ठरले असून, निसान हे ब्रँड भारतात विश्वासार्हतेचे प्रतीक आहे.
सिल्व्हर जुबिली ग्रुपचा वारसा १९३५ पासून पुणे कॅम्प परिसरात पेट्रोल पंप, कार शोरूम व सर्व्हिस स्टेशनच्या माध्यमातून दृढपणे रुजलेला आहे. सिल्व्हर मोटर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक सौ. राजवर्धिनी संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प साकारण्यात आला आहे.

प्रमुख मान्यवर उपस्थिती:
मा. आमदार रवींद्र चव्हाण (भाजप प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र), मा. राजेश पांडे (प्रदेश सरचिटणीस, महाराष्ट्र), मा. आमदार संजय जगताप ( भाजप प्रदेश सचिव, महाराष्ट्र), समरादित्य संजय जगताप, राजेंद्र पाटील, मा. खासदार अशोकअण्णा मोहोळ, मा. आमदार संग्रामदादा थोपटे, मा. आमदार दिलीपराव मोहिते, मा. आमदार रमेशअप्पा थोरात, मा. आमदार अशोकराव पवार, मा. आमदार अतुल बेनके, आमदार सुनील कांबळे,
पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष. वीरधवल जगदाळे, हरिभाऊ लोळे, अजय इंगळे, सौ. स्वरूपाताई थोपटे, सौ. सुजाताताई पवार,तुषार थोरात, सौ. प्राजक्ता दुर्गाडे, डॉ. दिगंबर दुर्गाडे (चेअरमन, पीडीसीसी बँक), उपाध्यक्ष सुनील चांदेरे, माजी अध्यक्ष रमेश थोरात तसेच सर्व संचालक मंडळ, संत सोपानकाका सहकारी बँकेचे चेअरमन व सर्व संचालक, अधिकारी व कर्मचारी, श्रीमती आनंदीकाकी चंद्रकांत जगताप (नगराध्यक्ष, सासवड नगरपालिका), सनदी अधिकारी डॉ. राजेंद्र चंद्रकांत जगताप (आयडीईएस), संरक्षण मंत्रालय – प्रिन्सिपल डायरेक्टर, सदर्न कमांड, केतकी शिर्के, सौ. नीताताई पाटील (पवार), सौ. गौरवी अतुल भोसले (चेअरमन, जागृती साखर कारखाना), संभाजी ब्रिगेडचे प्रवीणदादा गायकवाड तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, सर्व संचालक, अधिकारी व कर्मचारी तसेच सिल्व्हर मोटर्सचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन शोरूममध्ये अत्याधुनिक वाहनांची श्रेणी उपलब्ध असून, आधुनिक सुविधा व ग्राहक-केंद्रित सेवेमुळे पुणेकरांना उत्कृष्ट अनुभव मिळणार आहे. तसेच सिल्व्हर मोटर्स – निसान लवकरच पुणे शहर व जिल्ह्यात विस्तार करणार असल्याचे सांगण्यात आले.


