28 C
New Delhi
Friday, July 10, 2026
Homeताज्या बातम्याअर्ज माघारीनंतर बारामतीत २३; राहुरीत ७ उमेदवार रिंगणात

अर्ज माघारीनंतर बारामतीत २३; राहुरीत ७ उमेदवार रिंगणात

BARAMATI VIDHANSABHA ELECTION | बारामती- : बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा ९ एप्रिल हा शेवटचा दिवस ठरल्याने राजकीय घडामोडींना वेग आला. अखेरच्या दिवशी झालेल्या नाट्यमय घडामोडींनंतर दोन्ही मतदारसंघांतील अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. बारामतीत २३ उमेदवार, तर राहुरीत ७ उमेदवार अंतिम रिंगणात उतरले आहेत. SUNETRA PAWAR

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत (ELECTION) एकूण २३ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. यापैकी केवळ १० उमेदवार बारामती मतदारसंघातील असून उर्वरित १३ उमेदवार सोलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण आणि पुणे परिसरातील आहेत. त्यामुळे ही निवडणूक अधिक रंगतदार होणार असल्याचे चित्र आहे.

अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी तब्बल ३० उमेदवारांनी (POLITICS) माघार घेतली. दरम्यान, काँग्रेसने बारामतीतून माघार घेतल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुंबईत केली. मात्र, काँग्रेसच्या माघारीनंतरही ही निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

या निवडणुकीत सुनेत्रा अजित पवार यांची उमेदवारी चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. त्यांच्याविरोधात अभिजित बिचुकले आणि करुणा शर्मा मुंडे यांसारख्या उमेदवारांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरत आहे. हे दोघेही बाहेरील उमेदवार असल्याने ते कितपत प्रभावी आव्हान उभे करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राहुरीत तिरंगी लढतीची शक्यता

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत एकूण ७ उमेदवार अंतिम रिंगणात आहेत. सुरुवातीला ३० उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते, त्यापैकी २३ जणांनी माघार घेतली. येथे भारतीय जनता पक्ष, वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मतदान आणि मतमोजणी

बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकांसाठी २३ एप्रिल रोजी मतदान होणार असून ४ मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.


बारामती पोटनिवडणुकीतील उमेदवार

१) सुनेत्रा अजित पवार
२) प्रा. आर. वाय. घटूगडे
३) सतीश कृष्णा कदम
४) डॉ. अभिजित बिचुकले
५) अॅड. अविनाश गायकवाड
६) करुणा धनंजय मुंडे
७) गजानन पाटील
८) चंद्रकांत रांगाजी मोटे
९) चंद्रकांत वाघमोडे
१०) दत्तात्रय बेदरे
११) बाळासो मारुती धापटे
१२) मिथुन सोपान आटोळे
१३) मंगलदास तुकाराम निकाळजे
१४) योगेश मोहन उल्हासनगर
१५) भोसले रोहित राजू
१६) डॉ. विजयकुमार रामचंद्र भिसे
१७) विराज महादेव शिंदे
१८) शिवाजी कोकरे
१९) सतीश सोनवणे
२०) सागर शरद भिसे
२१) साजन भगवान आडसुळ
२२) सीताराम विठ्ठल रणदिवे
२३) सोनाली राणे

राहुरी पोटनिवडणुकीतील उमेदवार

१) अक्षय कर्डिले – भाजप
२) गोविंद मोकाटे – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)
३) संतोष चोलके – वंचित बहुजन आघाडी
४) रावसाहेब खेवरे
५) अनिल जाधव
६) जलिंदर घीगे
७) एक अपक्ष उमेदवार

या दोन्ही मतदारसंघांतील निवडणुका राज्याच्या राजकारणासाठी महत्त्वाच्या मानल्या जात असून निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
28 ° C
28 °
28 °
76 %
2.2kmh
100 %
Thu
28 °
Fri
37 °
Sat
42 °
Sun
42 °
Mon
42 °

Most Popular

Recent Comments