14.1 C
New Delhi
Thursday, November 27, 2025
Homeताज्या बातम्या"शिष्यवृत्तीच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांची झेप: पाचवी-आठवी निकाल जाहीर"

“शिष्यवृत्तीच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांची झेप: पाचवी-आठवी निकाल जाहीर”

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती(ScholarshipResult) परीक्षेचा तात्पुरता निकाल शुक्रवारी जाहीर झाला.(MaharashtraEducation) यंदा पाचवीचा निकाल २३.९० टक्के तर आठवीचा निकाल १९.३० टक्के लागल्याचे स्पष्ट झाले आहे.

पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी राज्यभरातून ५ लाख ६६ हजार ३६८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५ लाख ४७ हजार ५०५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि त्यातील १ लाख ३० हजार ८३४ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. त्यामुळे राज्याचा एकूण निकाल २३.९० टक्के इतका झाला.

आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ३ लाख ७८ हजार ९५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर ३ लाख ६५ हजार ७५४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ७० हजार ५६९ विद्यार्थ्यांनी यश मिळवत निकाल १९.३० टक्क्यांवर पोहोचवला.

पुणे जिल्ह्याची कामगिरी:
पुणे जिल्ह्यात पाचवीसाठी ६१ हजार ५५१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५९ हजार ४८९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि त्यातील १७ हजार ७८६ विद्यार्थ्यांनी यश मिळवले. पुणे जिल्ह्याचा निकाल २९.९० टक्के आहे.
आठवीच्या परीक्षेसाठी ३९ हजार १४८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३७ हजार ७५१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि ८ हजार ९५४ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळवली. या गटाचा निकाल २३.७२ टक्के आहे.

राज्य परीक्षा परिषदेकडून ही आकडेवारी जाहीर करताना अंतिम निकालासाठी हरकती आणि शंका नोंदविण्याची सुविधा देण्यात आली असून, अंतिम निकाल लवकरच प्रसिद्ध होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
14.1 ° C
14.1 °
14.1 °
72 %
0kmh
0 %
Wed
20 °
Thu
25 °
Fri
26 °
Sat
26 °
Sun
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!