27.5 C
New Delhi
Friday, October 10, 2025
Homeताज्या बातम्या‘आमदार आपल्या दारी’ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

‘आमदार आपल्या दारी’ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

नागरिकांच्या समस्या थेट मांडण्याची संधी; विविध योजनांचे लाभ वाटप

रहाटणी, – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील रहिवाशांच्या अडचणी, समस्या आणि स्थानिक प्रश्न थेट जाणून घेण्यासाठी ‘आमदार आपल्या दारी’ (amdar aplya daari) या उपक्रमाचे आयोजन रहाटणी येथील थोपटे लॉन्समध्ये करण्यात आले होते. या उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमात नागरिकांनी आपल्या परिसरातील विविध समस्या मांडल्या. यामध्ये रस्त्यांची दुर्दशा, अपुरा पाणीपुरवठा, वीजपुरवठ्याची समस्या, स्वच्छतेचा अभाव, ड्रेनेजची अडचण अशा महत्त्वपूर्ण विषयांचा समावेश होता. उपस्थित अधिकाऱ्यांनी नागरिकांचे म्हणणे गांभीर्याने ऐकले आणि आमदारांकडून तातडीने आवश्यक सूचना देण्यात आल्या.

कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभही देण्यात आला. विशेषतः श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना यांतून पात्र लाभार्थ्यांना पेन्शन पत्रके वाटप करण्यात आली. यामुळे अपंग, ज्येष्ठ नागरिक, विधवा महिलांना दिलासा मिळाला.

‘आमदार आपल्या दारी’ उपक्रमामुळे लोकप्रतिनिधींशी थेट संवाद साधता येतो, समस्यांचे निवारण जलद गतीने करता येते, यामुळे नागरिकांमध्ये समाधानाची भावना दिसून आली. जनतेच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष निर्णय घेण्याचे काम या कार्यक्रमातून झाले, असे मत अनेकांनी व्यक्त केले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या निष्पाप भारतीय नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली. देशासाठी प्राण गमावलेल्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना वातावरण भावनिक झाले.

या कार्यक्रमास अतिरिक्त तहसीलदार जयराज देशमुख, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी नगरसेवक कैलास थोपटे, नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, चंद्रकांत नखाते, सविता खुळे, स्वीकृत नगरसेवक गोपाळ माळेकर, संदीप गाडे, विनोद तापकीर, संदीप नखाते, मंडल अध्यक्ष सोमनाथ तापकीर, हर्षल नढे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष नरेंद्र माने, सदस्य संजय मराठे, आदिती निकम, कुंदा गडदे, सामाजिक कार्यकर्ते गणेश नखाते, देविदास तांबे, नरेश खुळे, विशाल माळी, संजय भोसले, बाळासाहेब पवार, रणजीत घुमरे, दिगंबर सुरवसे, युवा मोर्चा अध्यक्ष राज तापकीर, संकेत माळेकर, बूथ प्रमुख ब्रह्मा सूर्यवंशी, आकाश जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
27.5 ° C
27.5 °
27.5 °
40 %
3.3kmh
0 %
Thu
28 °
Fri
31 °
Sat
32 °
Sun
33 °
Mon
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!