12.1 C
New Delhi
Thursday, November 27, 2025
Homeताज्या बातम्यासुरक्षा ठेवीची अतिरिक्त रक्कम भरण्याचे महावितरणचे आवाहन

सुरक्षा ठेवीची अतिरिक्त रक्कम भरण्याचे महावितरणचे आवाहन

पुणे, –: महावितरणच्या पुणे परिमंडलातील वीजग्राहकांना माहे एप्रिल / मे महिन्याच्या वीजबिलांसोबत सुरक्षा ठेवीची अतिरिक्त रक्कम भरण्यासाठी स्वतंत्र बिल देण्यात येत आहे. या सुरक्षा ठेवीच्या अतिरिक्त रकमेचा वीजग्राहकांना भरणा करावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आला आहे.

मा. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या विद्युत पुरवठा संहिता २०२१ च्या विनिमय १३.१ नुसार वीजग्राहकांकडून सुरक्षा ठेव आकारण्यात येते. दरवर्षी सुरक्षा ठेवीची पुनर्गणना करण्यात येते व त्यानुसार आर्थिक वर्ष संपल्यानंतर ग्राहकांच्या मागील एका वर्षातील सरासरी वीजवापराच्या आधारे नवीन सुरक्षा ठेवीची रक्कम निश्चित करण्यात येते. वीजग्राहकांची सुरक्षा ठेव ही मासिक बिल असेल तर तेथे सरासरी मासिक बिलाच्या दुप्पट आणि त्रैमासिक असेल तेथे सरासरी त्रैमासिक बिलाच्या दीडपट घेण्याची तरतूद मा. आयोगाकडून करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विनिमय १३.११ नुसार ग्राहकाने भरलेल्या सुरक्षा ठेव रकमेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या दराच्या सममूल्य दराने व्याजाची रक्कम वीजबिलाद्वारे समायोजित करून वीजग्राहकांना अदा करण्यात येते.

उदाहरणार्थ वीजग्राहकाचे वार्षिक सरासरी वीजबिल ५०० रुपये असल्यास त्याच्या दुप्पट म्हणजे एक हजार रुपयांची सुरक्षा ठेव असणे बंधनकारक आहे. मात्र प्रत्यक्षात सुरक्षा ठेवीचे ८५० रुपये जमा असल्यास संबंधित ग्राहकास १५० रुपयांचे अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे स्वतंत्र बिल देण्यात येत आहे. तसेच जमा असलेल्या सुरक्षा ठेवीची रक्कम वीजबिलात दरमहा नमूद करण्यात येत आहे.  

वीजग्राहकांना माहे एप्रिल / मे महिन्याच्या वीजबिलांसोबत सुरक्षा ठेवीतील फरकाची अतिरिक्त रक्कम भरण्यासाठी स्वतंत्र बिल देण्यात येत आहे. आतापर्यंत पुणे परिमंडलामध्ये आतापर्यंत १४ लाख ३९ हजार लघुदाब वीजग्राहकांना ३९० कोटी ३८ लाख रुपयांच्या अतिरिक्त सुरक्षा ठेवीची स्वतंत्र बिल देण्यात आले आहे. ही रक्कम भरण्यास महावितरणकडून जास्तीत जास्त सहा समान मासिक हप्त्यांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

लघुदाब वीजग्राहकांना सुरक्षा ठेवीची अतिरिक्त रक्कम घरबसल्या भरण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in ही वेबसाईट व महावितरण मोबाईल अॅपद्वारे सोय उपलब्ध आहे. वीजग्राहकांनी अतिरिक्त सुरक्षा ठेवीच्या बिलाची रक्कम भरून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
12.1 ° C
12.1 °
12.1 °
82 %
0kmh
0 %
Thu
25 °
Fri
26 °
Sat
26 °
Sun
25 °
Mon
22 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!